पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 12:46 PM2019-07-08T12:46:59+5:302019-07-08T12:48:20+5:30

श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते.

pandharpur wari 2019: bharud is part of social awareness work media : Sandhya Sakhi | पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी

पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी

googlenewsNext

- अमोल अवचिते- 
माळशिरस : वैष्णवजन विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने वारीत चालत असतो. त्याच्या मनात श्रद्धा असते. त्या श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते. असे सांगत शाळेत शिपाई काम करणाऱ्या संध्या साखी या त्यांच्या आईचा भारुडाचा वारसा पुढे घेऊन जात असताना सामाजिक सेवेचे व्रत पाळत आहेत.  
    त्यांच्या वडिलांचे निधन १२ जुनला   झाले आहे. मनात असलेले दु:ख घेईन मात्र  समाज प्रबोधनाचा वसा घेऊन चाललेल्या त्यांच्या आई संत तुकाराम महाराजांच्या पालखीत तर संध्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारीत भारुडाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत.
      त्यांच्या आईचा जन्म पंढरपूरला झाला. महाद्वार परिसरात वास्तव्य असल्याने त्या सतत दिंड्यामधून भजन , कीर्तन, कानावर पडत असे. त्यांचे  आजोळ विदभार्तील मोजरी. तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात बालपण गेलं.  अध्यात्मिक संस्कार तेव्हा पासूनच घडत गेले.
  संध्या साखी यांचा जन्मही पंढरपूरचा. एकुलती एक मुलगी..  घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे साखी कुटूंब  सोलापूरवरून पंढरपूरला स्थाईक झालं     आणि त्याच महाद्वार परिसरात संध्या याचं ही बालपण गेलं. 
   कालांतराने त्या त्यांच्या आई वडिलांसोबत वारीला जाऊ लागल्या. वारीत त्याच्यावर भारुडाचे संस्कार होऊ लागले. 

   आई प्रमाणे त्या भारुड सादरीकरण करतील असे त्यांना कधीही वाटले नव्हते. 
मात्र वारीला येणा?्या समाजाची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळते. अंधश्रद्धा ठेवणा?्या भक्तांना तसेच वेगवेगळ्या महत्वांच्या विषयावर प्रकाश टाकता येते. याची जाणीव होऊ लागली. 
 आईने सादर केलेली भारुडे मी ऐकायचे. लोकांच्या आग्रहाखातर भारुड म्हणू लागल्या. भारूडाचे लोक कौतुक करत असल्याने आनंद मिळत होता. 
     
ङ्घ..................................................
  त्या सांगतात, अध्यात्मात भारुडाचे महत्व निश्चितपणे  तसे सांगणे कठीण आहे.  परंतु औषधाची कडू गोळी जर आजारी माणूस घेत नसेल तर ते औषध पातळ व गोड बनवून देतात तस .....अध्यात्मिक तत्वज्ञान सोप्या भाषेत सोंग, हास्य, विनोदातून सामान्य माणसाच्या अंतरंगात उतरवण्याचे काम केले जाते. भारूडा च्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी लोक प्रभोधन करून धर्म जागृती करण्याचं कार्य केलं.

Web Title: pandharpur wari 2019: bharud is part of social awareness work media : Sandhya Sakhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.