रस्त्यांवर तळीराम सुसाटच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:34 AM2018-04-12T00:34:57+5:302018-04-12T00:34:57+5:30

नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, म्हणून शासनाकडून दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली. तसेच दारू पिऊन वाहन चालविताना पकडलेल्या चालकांचा फोटो आणि त्याचे तपशील सोशल मीडियावर जाहीर केले जातील, अशा उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

Paleiram on the streets well! | रस्त्यांवर तळीराम सुसाटच!

रस्त्यांवर तळीराम सुसाटच!

Next

पुणे : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, म्हणून शासनाकडून दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली. तसेच दारू पिऊन वाहन चालविताना पकडलेल्या चालकांचा फोटो आणि त्याचे तपशील सोशल मीडियावर जाहीर केले जातील, अशा उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. मात्र तरीही तळीरामांच्या संख्येत घट होत नसल्याचे गेल्या तीन महिन्यांत मोटार वाहन कायदा न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणाच्या संख्येवरून स्पष्ट होते, तर अवैध वाहतूकसुद्धा अजूनही सुरू असल्याचे दिसते.
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत दारू पिऊन निष्काळजीपणे (ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह अ‍ॅन्ड रॅॅश ड्रायव्हिंग) वाहन चालविल्याचे ४ हजार ८५० गुन्हे शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात दाखल झाले असून त्यातील २ हजार ७४१ प्रकरणे निकाली लागली आहेत. निकाली लागलेल्या तळीरामांकडून ६५ लाख २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या आकडेवारीच्या सरासरीचा विचार केला असता दररोज सुमारे ५० गुन्ह्यांची नोंद होत आहे, तर याच काळात अवैध वाहतूक करणाऱ्या पॅगो, जीप, सीक्ससीटरसारख्या वाहनांचे २५९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ३२० (गेल्या वर्षातील काही खटले) प्रकरणे निकाली लागली असून त्यांच्याकडून १६ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
त्यामुळे दारूच्या नशेत वाहन चालवताना पकडल्यानंतर होणारी कारवाई, निलंबित किंवा रद्द होणारा परवाना हे उपाय तळीराम चालकांना अद्याप लागू पडलेले नाहीत, तर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी विविध कारवाया व अवैध वाहतूक करणारे वाहने अगदी जप्त केल्यानंतरदेखील शहरातील जीवघेणा प्रवास थांबलेला नाही. कारवाई झाल्यास वाहनचालकांना ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो.
मद्यपान करून वाहन चालविल्याने अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना शहरात झाल्या आहेत. त्याबाबत जनजागृती व वेळप्रसंगी कारवाई करूनही ही ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्हचे प्रकार कमी झाले नसल्याचे या आकड्यांवरून दिसते. त्याचबरोबर अवध्ौ वाहतुकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
>ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन ठरतेय उपयोगी
पूर्वी एखाद्या वाहनचालकाने मद्यपान करून वाहन चालवित आहे, असा संशय आला तर त्याच्या रक्त व लघवीची तपासणी करण्यात येत असे. तपासण्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यावर कारवाई होत. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक पळवाटा असल्याने वाहनचालक सुटत. पण ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनमुळे चालक दारू पिऊन गाडी चालवत आहे की नाही हे लगेच समजते. त्यामुळे प्रकरणे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून न्यायालयात गुन्हा दाखल असलेल्यांची रांग लागत आहे.
जास्तीत जास्त ६ महिने कारावास किंवा २ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत. तसेच संबंधित घटनेनंतर ३ वर्षांच्या आत दुसºया किंवा त्यानंतरच्या
गुन्ह्यासाठी २ वर्षे कारावास किंवा २ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत. त्यानुसार भोसरी येथे मद्यपान करून रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकाला दोन महिने कारावासाची शिक्षा मोटार वाहन कायदा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एम. पी. सराफ यांच्या न्यायालयाने सुनावली आहे. अवैध वाहतूक व ड्रिंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह करणाºया चालकांना वाहतूक पोलीस घटनास्थळी समन्स बजावतात. समन्स घेऊन संबंधिताने मोटार वाहन कायदा न्यायालयात जायचे. त्या ठिकाणी गुन्हा कबूल केल्यास दंड वसूल करण्यात येतो. मात्र जर गुन्हा कबूल नसेल तर तो खटला चालविला जातो.
रिक्षाचालकाला दोन
महिने कारावासाची शिक्षा
मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८५ नुसार मद्यपान करून अथवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविणाºया व्यक्तीस पहिल्या गुन्ह्यासाठी

Web Title: Paleiram on the streets well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.