बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी नवल किशाेर राम यांच्‍या हस्ते पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:48 PM2019-05-08T14:48:21+5:302019-05-08T14:49:10+5:30

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानाचा असा पद्मविभूषण हा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांच्या हस्ते आदरपूर्वक प्रदान करण्यात आला.

The Padma Vibhushan award was presented to Babasaheb Purandare by district collector Naval Kishore Ram | बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी नवल किशाेर राम यांच्‍या हस्ते पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान

बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी नवल किशाेर राम यांच्‍या हस्ते पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान

googlenewsNext

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानाचा असा पद्मविभूषण हा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांच्या हस्ते आदरपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरंदरे यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी तहसिलदार तृप्ती काेलते - पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित हाेते. 

बळवंतर माेरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना 11 मार्च 2019 राेजी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार हाेता. परंतु या पुरस्कार प्रदान साेहळ्यासाठी वैयक्तिक कारणास्तव पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार ( पद्म विभूषण पदक, मिनिएचर व सनद (प्रमाणपत्र) आदरपूर्वक प्रदान केला. 

बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र घराेघरी पाेहचविण्याचे काम केले. त्यांच्या शाहिरीतून तसेच लेखनातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहास उलगडून सांगितला. त्यांना त्यांच्या याेगदानासाठी या आधी महाराष्ट्रभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. 

Web Title: The Padma Vibhushan award was presented to Babasaheb Purandare by district collector Naval Kishore Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.