कांदा, बटाटा दरात वाढ, गवार भावात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:03 PM2018-11-11T23:03:49+5:302018-11-11T23:04:18+5:30

चाकण बाजार समिती : कांद्याच्या आवकेत वाढ, मात्र बटाट्याच्या आवकेत घट

Onion, potato prices rise; | कांदा, बटाटा दरात वाढ, गवार भावात घट

कांदा, बटाटा दरात वाढ, गवार भावात घट

googlenewsNext

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा आवक वाढूनही भावात वाढ झाली. बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली. कांद्याला १३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बटाट्याला १८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

तरकारी विभागात गवार व शेवग्याचे भाव घटले. टोमॅटोची ९४७ क्रेट्स आवक झाली. टोमॅटोला १००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हिरव्या मिरचीची आवक घटून भावही घटले. बाजारात मिरचीची ३१५ पोत्यांची आवक झाली. मेथी, कोथिंबिरीचे भाव घटले. गाय-बैलांची विक्री घटली. बाजारात एकूण दोन कोटी चाळीस लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.
येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४०० क्विंटल होऊन कांद्याला कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ९१३ क्विंटल होऊन बटाट्याचा कमाल भाव १८०० रुपये प्रति क्विंटल झाला. बटाट्याची आवक ९१३ क्विंटल झाली. भुईमूग शेंगांची आवक ७ क्विंटल झाली असून, भुईमूग शेंगांना ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लसणाची एकूण ३ क्विंटल आवक झाली. लसणाचा कमाल भाव १८०० रुपयांवर स्थिर राहिला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ३१५ पोती आवक झाली. मिरचीला १५०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

सणासुदीमुळे फळांची आवक घटली

पुणे : सणासुदीच्या काळात फळांची तोडणी न झाल्याने रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात फळांची आवक घटल्याचे पाहायला मिळाले. मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणात होत असल्याने बोरे, कलिंगड, डाळिंब, चिक्कू, संत्रा आणि मोसंबीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. काश्मीर पट्ट्यात बर्फवृष्टी सुरू झाल्याने सफरचंदाची आवक घटून भाव पेटीमागे शंभर रुपयांनी वधारले. तर, राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे डाळिंब, लिंबे, मोसंबी तसेच संत्रीच्या आकारावर परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, आवक वाढल्याने पेरू, पपईच्या भावात घट झाली. इतर फळांची आवक-जावक कायम असल्याने भाव स्थिर राहिले.
रविवारी येथील फळबाजारात अननस ७ ट्रक, मोसंबी ७० टन, संत्री १२ टन, डाळिंब १०० ते १५० टन, पपई २० ते २५ टेम्पोे, लिंबाची २ ते ३ हजार गोणी, चिक्कू १ हजार डाग, पेरु ७०० ते ६०० क्रेटर्स कलिंगड १० ते १५ टेम्पो, खरबुज ८ ते १० टेम्पो, सफरचंद ४ ते ५ हजार पेटी आवक झाली.

फळभाज्या :
४चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : टोमॅटो - ९४७ पेट्या ( ५०० ते १००० रु. ), कोबी - २१० पोती ( ३०० ते ६०० रु. ), फ्लॉवर - २०० पोती ( ८०० ते १४०० रु.),
४वांगी - २२३ - पोती (२५०० ते ३५०० रु.), भेंडी - २५६ डाग (२००० ते ३००० रु.), दोडका - १९० पोती ( १००० ते २००० रु.),
४कारली - ३१५ डाग ( १००० ते २००० रु.), दुधीभोपळा - १४२ पोती ( ८०० ते १००० रु.), काकडी - २१५ पोती ( ८०० ते १६०० रु.),
४फरशी - ५२ पोती ( ३००० ते ४००० रु.), वालवड - १७२ पोती (३५०० ते ४५०० रु.), गवार - १० पोती ( ४००० ते ५००० रु.),
४ढोबळी मिरची - २१० डाग ( १००० ते २००० रु.), चवळी - १४० पोती ( १००० ते २००० रु. ), वाटाणा- ( आवक नाही ),
४शेवगा - ४० डाग ( २५०० ते
४५०० रुपये ).
 

Web Title: Onion, potato prices rise;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.