तब्बल १७ वेळा '' त्यांनी '' निवडला खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 07:19 PM2019-04-29T19:19:20+5:302019-04-29T19:28:14+5:30

पारतंत्र्यात असताना गांधीजींच्या विचारांशी सहमत असलेल्या कडपा यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर देशाने लोकशाहीचा स्वीकार केला...

One person who has elected 17 times MP | तब्बल १७ वेळा '' त्यांनी '' निवडला खासदार

तब्बल १७ वेळा '' त्यांनी '' निवडला खासदार

Next
ठळक मुद्देपहिल्या निवडणुकीपासून मतदान : वाकी बुद्रुक येथील वृद्धाने केला लोकशाही उत्सव साजरा लोकशाही तत्त्व आणि मूल्य जर टिकवायचे असेल तर मतदान केलेच पाहिजे असल्याचे मत

राजगुरूनगर (वाकी बुद्रुक) : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधी विचारांचा आदर करत आधी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यानंतर स्वतंत्र भारतात निवडणुका सुरू झाल्यापासून तब्बल १७ वेळा लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत त्यांनी खासदार निवडले. वाकी बुद्रुक येथील ९८ वर्षीय सखाराम गोपाळ  कडपा असे या वृद्धाचे नाव असून आजही लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
वाकी बुद्रुक येथील संतोषनगर येथील रहिवासी असलेले सखाराम कडपा यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून मतदानाचा हक्क बजावला आहे. पारतंत्र्यात असताना गांधीजींच्या विचारांशी सहमत असलेल्या कडपा यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर देशाने लोकशाहीचा स्वीकार केला. लोकशाहीत देशांची सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेत चांगले प्रतिनिधी जावे, यासाठी मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. या हेतूने त्यांनी आतापर्यंत सर्वच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही तत्त्व आणि मूल्य जर टिकवायचे असेल तर प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे ते म्हणाले. सुरुवातीला मतदानाचा उत्साह काही निराळा असायचा. कार्यकर्ते स्वखुषीने दारोदार फिरून मतदान जागृतीसाठी प्रयत्न करायचे. मात्र, बदलत्या युगात ही पूर्वीसारखे कार्यकर्ते राहिले नाहीत, अशी खंत व्यक्त करीत आजची निवडणूक प्रक्रियाही बदलली असल्याचे ते म्हणाले. ..
 

Web Title: One person who has elected 17 times MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.