भीमा नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून एका मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 08:32 PM2018-05-09T20:32:08+5:302018-05-09T20:49:51+5:30

मंगळवारी (दि. ८) सकाळी भीमा नदीच्या पात्रात तीन मुली पोहण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली.

one girl death Due to not having an estimate of water in the Bhima river | भीमा नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून एका मुलीचा मृत्यू

भीमा नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून एका मुलीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देदोघी मुली वाचल्या : सादलगावला भीमापात्रातील घटना

रांजणगाव सांडस : सादलगाव (ता. शिरूर) येथे भीमा नदीपात्रात बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ८) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.प्रतिभा दत्तात्रय फडतरे (वय १२, रा. सादलगाव, ता. शिरूर) असे मृत मुलीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी (दि. ८) सकाळी साडेअकराच्या सुमारास तीन मुली भीमा नदीवर पोहण्यासाठी गेल्या होत्या. सर्वच मुली पाण्यात उतरून पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिनही मुली पाण्यामध्ये बुडू लागल्या. त्यांनी जीव वाचविण्यासाठी मोठा आरडाओरडा केला. कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी हा आरडाओरडा ऐकला. त्यातील काही महिलांनी धाडस व प्रसंगावधान दाखवत मुलींना वाचण्याचा प्रयत्न केला व इतर नागरिकांना मदतीसाठी हाका मारल्या. त्यानंतर शेजारील काही तरुणांनी लागलीच धाव घेत पाण्यात उड्या मारल्या व तीन मुलींना तत्काळ पाण्याबाहेर काढले. तीनपैकी प्रतिभा हिची प्रकृती खालावल्याने जागीच मृत्यू झाला. इतर दोन मुलींना उपचारासाठी मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: one girl death Due to not having an estimate of water in the Bhima river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.