शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 05:11 AM2017-09-29T05:11:53+5:302017-09-29T05:12:06+5:30

On one of the eight main roads in the city, one minute running on one, while on the other three routes every two minutes | शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल

शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल, असे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय गर्दीच्या वेळी बसची संख्या वाढवणे, काही मार्गांच्या फेºयांत वाढ करणे आणि काही बसचे मार्ग वाढविण्यात आले आहेत. या बदलाची अंमलबजावणी देखील सुरू झाली असल्याची माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कात्रज-स्वारगेट, स्वारगेट-शिवाजीनगर, मनपा भवन-निगडी, औंध-डांगे चौक, येरवडा-खराडी बायपास रस्ता, महात्मा गांधी स्थानक-हडपसर रस्ता, डेक्कन-वारजे-माळवाडी आणि डेक्कन ते कोथरूड या मार्गावर दर मिनिटाला एक बस धावेल, असे नियोजन करण्यात आले आहे. सिमला आॅफिस ते हिंजवडी रस्ता, कासारवाडी ते भोसरी रस्ता आणि संगमवाडी येथे विश्रांतवाडी रस्त्यावर दर दोन मिनिटाला बस धावेल. या अकरा मार्गावर एकूण १ हजार ५८२ बस १७ हजार ९६८ फेºया दर दिवशी करतील. या शिवाय शनिपार, अप्पर, स्वारगेट, कोथरूड, भारती विद्यापीठ अशा विविध १६ मार्गांवरील बसची संख्या एकपासून पाचपर्यंत वाढविण्यात आली आहे. या मार्गांवरील बसची संख्या ८० वरून ११४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गर्दीच्या १९ मार्गांवरील बसच्या संख्येत २१८ वरून ३२१ पर्यंत वाढ करण्यात आली असून, येथील खेपा १ हजार ९९ होतील.

पास दरवाढीनंतर उत्पन्न कायम
ज्येष्ठ नागरिक आणि इतर पासच्या दरात वाढ केल्यानंतरही पासचे दर दिवसाचे उत्पन्न २४ ते २५ लाख रुपयांच्या घरातच आहे. तसेच, प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे.

या मार्गांवरील बसच्या संख्येत झाली वाढ
मनपा-तळेगाव, भेकराईनगर-आळंदी, शेवाळवाडी-पिंपळे गुरव, कात्रज-हडपसर, कात्रज-भोसरी, पुणे स्टेशन-हिंजवडी फेज ३, भेकराईनगर-चिंचवडगाव, वज्र २ वारजे माळवाडी-वाघोली, शेवाळवाडी- पिंपरी पालिका, मनपा भवन-कोंढवा गेट, कात्रज-चिंचवड, वारजे-माळवाडी-चिंचवड, निगडी-भक्ती-शक्ती धायरी, कोथरूड डेपो-कात्रज, हडपसर-वारजे माळवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन- वारजे-माळवाडी, कात्रज-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, हडपसर-हिंजवडी माण फेज ३, स्वारगेट-विश्रांतवाडी या मार्गावरील बसची संख्या २१८ वरून ३२१ झाली आहे. या मार्गांवर बसच्या एकूण एक हजार ९९ खेपा होतील.

बोनसचा निर्णय पीएमपी घेईल
पीएमपीमधील पीएमटी कर्मचाºयांना बोनस देण्यात यावा, असा ठराव पुणे पालिकेच्या स्थायी समितीने केला आहे.
कर्मचाºयांना बोनस देण्याचा अंतिम निर्णय पीएमपीच घेईल, अशा शब्दांत पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बोनसच्या निर्णयावर भाष्य केले.

महिलांसाठी ७ मार्गांवर विशेष बस
महिलांसाठी भोसरी-मनपा भवन (बस क्रमांक ३१५ ), निगडी-मनपा भवन (१२३), कात्रज-शिवाजीनगर (२), भेकराईनगर-मनपा (१११), कात्रज-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), वारजे-माळवाडी मनपा (८२) आणि धनकवडी-न.ता.वाडी (३८) अशा ८ बस धावतील. यातील कात्रज ते शिवाजीनगर या मार्गावर दोन बसच्या
२४ फेºया होतील.

गरज आणि व्यवहारिकता या कसोटीवर बसमार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक मार्गावरील प्रवाशांची संख्या, गर्दीचा कालावधी लक्षात घेऊनच विविध मार्गावर बस वाढविण्यात आल्या आहेत. याच निकषानुसार बससंख्या, बसच्या खेपा वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या १५०० बस रस्त्यावर असून, ही संख्या लवकरच १५५० पर्यंत नेण्यात येईल. - तुकाराम मुंढे, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी ं

Web Title: On one of the eight main roads in the city, one minute running on one, while on the other three routes every two minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे