जावयाने फसवून विकलेली जमीन वृद्ध जोडप्याला मिळाली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 08:58 PM2018-04-06T20:58:43+5:302018-04-06T20:58:43+5:30

सासू, सासरे व पत्नीच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेत जावयाने विकलेली जमीन अखेर ‘त्या’ वृद्ध जोडप्याला परत मिळाली. पुरंदर तालुक्यात हा खळबळजनक प्रकार घडला होता.

The old couple got back their fraudulently selling land by son in law | जावयाने फसवून विकलेली जमीन वृद्ध जोडप्याला मिळाली परत

जावयाने फसवून विकलेली जमीन वृद्ध जोडप्याला मिळाली परत

googlenewsNext
ठळक मुद्देकर्जमाफीच्या बहाण्याने फसवणूक दोन एकर जमीन परत मिळाल्याने चोभे-चव्हाण परिवाराच्या डोळ्यात आनंदाश्रू

जेजुरी : सासू, सासरे व पत्नीच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेत जावयाने विकलेली जमीन अखेर ‘त्या’ वृद्ध जोडप्याला परत मिळाली. पुरंदर तालुक्यात हा खळबळजनक प्रकार घडला होता. ‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडली होती. पांडेश्वर येथील किसन आबु चोभे-चव्हाण व लक्ष्मीबाई किसन चोभे-चव्हाण यांना कर्जमाफीच्या बहाण्याने फसवणूक करीत कुलमुखत्यार पत्र करून घेत दोन एकर जमिनीची विक्री करणारा जावई आणि जमीन खरेदीदार मित्र यांनी स्वखर्चाने जमीन उलट खरेदीखत करून परत दिली आहे. याबाबतचे वृत्त असे की, किसन आबू चोभे-चव्हाण व लक्ष्मीबाई किसन चोभे-चव्हाण यांची सासवड-सुपा रोडवर पांडेश्वर येथे बागायती शेतजमीन आहे. १ जानेवारी रोजी त्यांचे जावई संतोष कामठे (वनपुरी) यांनी सरकारने कर्जमाफी केली आहे, त्यासाठी तालुक्याला जाऊन सह्या -अंगठे करावे लागतात, असे सांगून कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतले. त्यानंतर ३ जानेवारीला दोन व्यक्तींना प्रत्येकी एक -एक एकर जमिनीचे खरेदीखत करून दिले होते. वृद्ध जोडप्याचा मुलगा सोसायटीचे कर्ज मागणीसाठी तलाठी कार्यालयात १७ मार्च रोजी ७/१२ उतारा काढण्यासाठी गेला असता आपली जमीन फसवणूक करून परस्पर विक्री केल्याची बाब उघड झाली होती. वृद्ध जोडप्याने आपली मुलगी व जावई यांना संपर्क साधला असता जावई जमीन खरेदीदारांबरोबर बँकॉक येथे फिरण्यासाठी गेले असल्याचे समजले. वृद्ध जोडपे त्यांची मुलगी व परिवाराने तत्काळ सासवड पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २५ मार्चच्या अंकात प्रसिद्ध केले होते. यानंतर चोभे-चव्हाण परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी विविध संघटनाच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तसेच सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी ही बाब गांभिर्याने घेऊन या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली. जमीन विक्री करणारे जावई संतोष कामठे, खरेदीदार, साक्षीदार यांना पोलीस ठाण्यात पाचारण करत पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. सर्वांनी आपली चूक मान्य करीत वृद्ध जोडप्याला स्व:खर्चाने उलट खरेदीखत करून देत जमीन परत करण्याचे मान्य केले आणि दोन दिवसांपूर्वी उलट खरेदीखत करून देण्यात आले. एक रुपयाचाही मोबदला न देता फसवणूक करून विक्री झालेली दोन एकर जमीन परत मिळाल्याने चोभे-चव्हाण परिवाराच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. जमीन परत मिळाली नसती तर आमच्या समोर उदरनिवार्हाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता, असे यावेळी लक्ष्मीबाई चोभे-चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: The old couple got back their fraudulently selling land by son in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.