प्राणांतिक अपघातांची संख्या झाली कमी ; वाहतूक पाेलिसांच्या शिस्तीचा परीणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 03:03 PM2019-05-10T15:03:59+5:302019-05-10T15:20:48+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील प्राणांतिक अपघाताची संख्येत घट झाली आहे.

The number of fatal accident decreases; effect of traffic police discipline | प्राणांतिक अपघातांची संख्या झाली कमी ; वाहतूक पाेलिसांच्या शिस्तीचा परीणाम

प्राणांतिक अपघातांची संख्या झाली कमी ; वाहतूक पाेलिसांच्या शिस्तीचा परीणाम

Next

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील प्राणांतिक अपघाताची संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांच्या तुलनेत यंदा प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 21. 83 ट्क्क्यांनी कमी झाले आहे. असे असले तरी गंभीर अपघातांमध्ये या कालावधीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.60 टक्के इतकी वाढ झाली आहे. 

शहरातील प्राणांतिक तसेच गंभीर अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी वाहतूक पाेलिसांकडून विविध उपाययाेजना राबविण्यात येत आहेत. दुचाकी चालकांचे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जानेवारी पासून शहरात हेल्मेट सक्ती जाेरदार करण्यात आली आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्यात येत आहे. त्याचबराेबर सीसीटिव्हीच्या माध्यमातून देखील कारवाई करण्यात येत असल्याने नियम माेडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्राणांतिक अपघाताचे प्रमाण देखील 21 टक्क्यांनी कमी झाले आहे. 

मागील वर्षी आणि या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान झालेल्या अपघातांची आकडेवारी 

 

 

जानेवारी 

2018

 

जानेवारी 

2019            

 

फेब्रुवारी 

 2018  

 

फेब्रुवारी  

2019  

 

मार्च

2018

 

मार्च

2019

 

एप्रिल

2018  

 

एप्रिल  

2019

प्राणांतिक अपघात2415              16  24        2720  209
गंभीर अपघात    38  33    22  35            30363523
किरकाेळ अपघात  21      22              21          9              13        11      19       -

-

Web Title: The number of fatal accident decreases; effect of traffic police discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.