मराठा क्रांती माेर्चाचे जिल्हा अाणि तालुका पातळीवर बेमुदत चक्री उपाेषण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 04:39 PM2018-08-18T16:39:01+5:302018-08-18T16:44:01+5:30

मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी अाता बेमुदत चक्री उपाेषण अांदाेलन करण्यात येणार अाहे.

now hunger strike protest announced by maratha kranti morcha | मराठा क्रांती माेर्चाचे जिल्हा अाणि तालुका पातळीवर बेमुदत चक्री उपाेषण

मराठा क्रांती माेर्चाचे जिल्हा अाणि तालुका पातळीवर बेमुदत चक्री उपाेषण

Next

पुणे :  मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अारक्षण व इतर मागण्यांसाठी राज्यभरात माेर्चे काढण्यात अाले. राज्यातील काही भागांमध्ये या माेर्च्यांना हिंसक वळण लागले. त्यानंतर मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने चूलबंद अांदाेलन करण्यात अाले हाेते. येथून पुढची अांदाेलनाची दिशा ठरवताना अाता जिल्हा अाणि तालुका पातळीवर बेमुदत चक्री उपाेषण अांदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा मराठा क्रांती माेर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शांताराम कुंजीर, राजेंद्र काेंढरे, तुषार काकडे अादी उपस्थित हाेते. 20 अाॅगस्ट राेजी पुण्यातील विभागीय अायुक्त कार्यालयासमाेर हे बेमुदत चक्री उपाेषण करण्यात येणार अाहे. 

    मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक माेर्चे काढण्यात अाले. 9 अाॅगस्ट राेजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली हाेती. या दिवशी पुण्यासह काही ठिकाणी या अांदाेलनाला गालबाेट लागले हाेते. त्यामुळे येथून पुढील सर्व अांदाेलने ही शांततेच्या मार्गाने तसेच मराठा क्रांती माेर्चाच्या अाचारसंहितेला धरुनच हाेतील असे समन्यवयकांकडून सांगण्यात अाले अाहे. 20 अाॅगस्ट राेजी हाेणारे अांदाेलन हे शांततेने शिस्तीने हाेईल, त्यासाठी अाचारसंहिता तयार करण्यात अाली असून या अाचारसंहितेला धरुनच अांदाेलन करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात अाले. तसेच या अांदाेलनावेळी काेणी प्रक्षाेभक भाषण करणार नाही, प्रक्षाेभक घाेषणा देणार नाही, सर्वसामान्यांना त्रास हाेणार नाही, सरकारी मालमत्तेचे नुकसान हाेणार नाही अश्या पद्धतीने अांदाेलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात अाले. तसेच 9 अाॅगस्टच्या अांदाेलनात पुण्यातील जिल्हाधीकार्यालयाजवळ पत्रकारांसाेबत झालेल्या गैरवर्तनाबाबत दिलगीरी यावेळी व्यक्त करण्यात अाली. 

    त्याचबराेबर अांदाेलनाच्या मागणीबराेबरच ज्या 15 मागण्या अाहेत त्या साेडविण्याच्या दृष्टीकाेनातून येत्या 10- 12 दिवसांमद्ये अाैरंगाबादमध्ये राज्य समन्वयक समितीची बैठक हाेणार अाहे. या बैठकीत या 15 मागण्या कशा साेडवायच्या यावर चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येणार अाहे. 

Web Title: now hunger strike protest announced by maratha kranti morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.