शहरातील तीन हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना प्रशासनाकडून नोटीसा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 08:44 PM2019-03-15T20:44:19+5:302019-03-15T20:48:51+5:30

शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टी धारक असताना  केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे.

Notices from the administration to three thousand pune citizens | शहरातील तीन हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना प्रशासनाकडून नोटीसा

शहरातील तीन हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना प्रशासनाकडून नोटीसा

Next
ठळक मुद्देपाणीपट्टीची तब्बल ४६८ कोटींची थकबाकी : थकबकी वसुलीसाठी रविवारी महापालिकेत लोकअदालत

पुणे: शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, उत्पन्नाचे स्त्रोत मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असताना शहरामध्ये पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ४६८ कोटींच्या घरात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासनाने आता ही थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली असून, थकबाकीदार तब्बल ३ हजार पुणेकरांना नोटीसा पाठविल्या आहेत. तसेच ही थकबाकी वसुलीसाठी येत्या रविवार (दि.१५) मार्च रोजी लोकअदालत भरविण्यात येणार आहे. 
शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टी धारक असताना  केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे. यामध्ये सध्या शहरामध्ये घरगुती वापराचे सुमारे १ लाख २२ हजार अधिकृत नळ कनेक्शनच आहेत. तर व्यावसायिक, औद्यागिक वापराचे सुमारे ३८ हजार नळ कनेक्शन आहेत. यातमध्ये घरगुती वापर करत असलेल्या कुटुंबाकडे सुमारे १३७.५७ कोटी रुपयांची तर औद्यागिक व व्यावसायिक वापर करत असलेल्याकडे तब्बल ३३०.१५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
महाालिका प्रशासनाकडून विविध पातळीवर पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु थकबाकीदारांमध्ये दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर, रस्ते दुरुस्ती, रुंदीकरमध्ये बंद पडलेली नळ कनेक्शन असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या देखील वाढली आहे. तसेच प्रशासनाच्या चुकीमुळे २०-२५ वर्षे काही सोसायट्यांना पाणी पट्टीच दिली नसल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत पाणी पट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असून, आज अखेर ही थकबाकी तब्बल ४६८ कोटींवर जाऊन पोहचली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता जाहिरल्याने महापालिकेची अनेक कामे ठप्प झाली आहेत. परंतु प्रशासनाने आता आचारसंहितेच्या काळात थकबाकी वसुलीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.
----------------
यंदा प्रथमच थेट न्यायालयाकडून नोटीसा
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून थकबाकीदार पुणेकरांना पाणीपट्टी भरण्यासाठी नियमित नोटीसा देण्यात येतात. परंतु महापालिकेच्या नोटीसांना संबंधित थकबाकीदांर फारस महत्व देत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळेच यंदा प्रथमच थेट न्यायालयाकडून तब्बल ३ हजार थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदलातमध्ये तडजोड करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून नोटीसा गेल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकीदार तडजोडीसाठी येत आहेत.
-व्ही.जी.कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागा प्रमुख
-------------
तब्बल पाच लाख पाणीपट्टी
वनाज येथील एका सोसायटीने तब्बल २५ वर्षे पाणीपट्टी भरली नसल्याचे नुकतेच महापालिकेच्या निदर्शनास अले. या एका सोसायटीकडे सुमारे ५ लाखांपेक्षा अधिकारी थकबाकी असल्याचे चौकशीनंतर स्पष्ट झाले. यामुळे महापालिकेकडे नोंद असलेल्या या सोसायटीची बिल्डींग बांधलेल्या बिल्डरलाच महापालिकेने तब्बल ५ लाखांची थकबाकी असल्याची नोटीस दिली. परंतु बिल्डींग बांधून संबंधित सोसायटीकडे सर्व हक्क देऊन अनेक वर्षे लोडले असून, आलेली नोटीस चुकीची असल्याचे संबंधित थकबाकीदारांचे म्हणणे. याबाबत रविवारी होणा-या लोकअदालतमध्ये चर्चा होईल.
____________________________________________

Web Title: Notices from the administration to three thousand pune citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.