मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये, शरद पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:13 AM2018-04-30T05:13:26+5:302018-04-30T05:13:26+5:30

मागील निवडणुकीत काही चुकांमुळे अनेक जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार निवडून आले.

No one should play Rudi's game, Sharad Pawar's warning | मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये, शरद पवार यांचा इशारा

मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये, शरद पवार यांचा इशारा

Next

पुणे : मागील निवडणुकीत काही चुकांमुळे अनेक जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार निवडून आले. आगामी लोकसभा- विधानसभा पोटनिवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी मित्रपक्षांना बरोबर घेऊन समन्वयाने एकत्रित निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. परंतु, ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या आम्हालाच मिळाव्यात. मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
येथील निसर्ग मंगल कार्यालयत प्रदेश राष्ट्रवादी काँगे्रसच्या संघटनात्मक निवडीसाठी झालेल्या बैठकीत पवार बोलत होते. देशात प्रचंड अस्वस्थता आहे. महिला, दलित, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याकांबद्दल सरकारची बांधिलकी नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेला धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी पोटनिवडणुकीत सत्ताधाºयांचा पराभव केला. लोकांचे मत कोणत्या दिशेने चालले आहे, हे या निकालातून दिसते, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, राज्यात पालघर, भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात, सांगलीतील पलूस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पुढील दोन महिन्यांत विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक होत आहे. सत्ताधाºयांना रोखण्यासाठी या निवडणुका मित्रपक्षांना सोबत घेऊन लढण्यासाठी समन्वयाची भूमिका घेण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. परंतु, आम्ही समन्वयाची भूमिका घेत असताना मित्रपक्षाने तशीच रास्त भूमिका घ्यावी, ही अपेक्षा आहे. पूर्वी ज्या जागांवर जो पक्ष जिंकला आहे, ती जागा त्याच पक्षाने लढवावी.
ईव्हीएम यंत्रणेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. मतदान सुरू होण्यापूर्वी संबंधित केंद्रावरील मशीनची चाचणी व्हावी, यासाठी आग्रह धरला पाहिजे. सध्या या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर अनेक पक्ष एकत्र येत आहेत. सत्ताधारी असलेल्यांकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना न बोलणारा पंतप्रधान म्हटले जायचे. त्या तुलनेत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप बोलतात. परंतु, जेथे बोलायचे तेथे बोलत नाहीत, असा चिमटा पवार यांनी काढला. हे सांगत असताना त्यांनी दलितांवरील अत्याचार, नुकतेच घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनांची उदाहरणे दिली.

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बसपाने एकत्र येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपाला मात दिली. जनतेमध्ये भाजपाविरोधी मतप्रवाह सुरू झाल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. शरद पवार यांची देशपातळीवर महत्त्वाची भूमिका आहे. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी पवार यांच्यावर आहे. पवारांना मिळणारा सन्मान आपण निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळवून दाखवून देण्याच्या दृष्टीने संघटनात्मक काम करावे, असे आवाहन पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी केले.

आगामी निवडणुकीत मोदी सरकार दिसणार नाही
आगामी निवडणुकीत मोदी सरकार सत्तेत दिसणार नाही. देशाच्या राजकारणात शरद पवार यांचे नेतृत्व असामान्य असल्याचे मत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केले.

Web Title: No one should play Rudi's game, Sharad Pawar's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.