एनआयआरएफ रँकिग : मुंबई आयआयटी, पुणे विद्यापीठ राष्ट्रीय मानांकनात वरच्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:45 AM2018-04-04T04:45:00+5:302018-04-04T04:45:00+5:30

विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील दोन हजारांहून अधिक उच्चशिक्षण संस्थांचे यंदाच्या वर्षाचे ‘एनआयआरएफ रँकिग’ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले.

NIRF Ranking: Mumbai IIT, Pune University top position in national ranking | एनआयआरएफ रँकिग : मुंबई आयआयटी, पुणे विद्यापीठ राष्ट्रीय मानांकनात वरच्या स्थानी

एनआयआरएफ रँकिग : मुंबई आयआयटी, पुणे विद्यापीठ राष्ट्रीय मानांकनात वरच्या स्थानी

googlenewsNext

पुणे  - विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील दोन हजारांहून अधिक उच्चशिक्षण संस्थांचे यंदाच्या वर्षाचे ‘एनआयआरएफ रँकिग’ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले. या मानांकनांमध्ये सर्व संस्थांच्या सामायिक रॅकिंगच्या पहिल्या १० संस्थांमध्ये आयआयटी, मुंबईने तिसरे तर विद्यापीठांच्या पहिल्या १० रॅकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नववे स्थान मिळविले.पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील एकाही पांरपरिक विद्यापीठाला या यादीत स्थान मिळालेले नाही.
याच कार्यक्रमात नऊ वर्गांमध्ये सर्वोच्च रँकिंग मिळविलेल्या ६९ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उच्च शिक्षण संस्थांना ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फे्रमवर्क’ (एनआयआरएफ) रॅकिंग देण्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदा या रँकिंगमध्ये एकूण २,८०९ संस्थांही सहभाग घेतला. सहभागी झालेल्या सर्व संस्थांना सामायिकपणे जी पहिली १० मानांकने दिली गेली त्यात मुंबई आयआयटीचा तिसरा तर सावित्राबाई फुले विद्यापीठाचा १६ वा क्रमांक लागला. सर्वोत्कृष्ट विद्यापीठे व महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये राज्यात अनुक्रमे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय अव्वल ठरले आहे. तर देशपातळीवर सर्व संस्थांमध्ये पुणे विद्यापीठाने मागील वर्षीच्या तुलनेत दोन क्रमांकांनी तर विद्यापीठांमध्ये एका क्रमांकाने प्रगती केली आहे. विद्यापीठांमध्ये राज्यातील पहिला क्रमांक पुणे विद्यापीठाने यंदाही कायम राखला. राज्यातील इतर पारंपरिक विद्यापीठे १०० ते २०० क्रमांकामध्ये आहेत.

सामायिक रँकिंगमध्ये राज्यातील संस्था

१. आयआयटी मुंबई (३)
२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१६)
३. इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई (३०)
४. इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे (३२)
५. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्युट, मुंबई (४१)
६. टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्स, मुंबई (४९)
७. सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे (६७)
८. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (७९)
९. एसव्हीकेएम नरसी मोनजी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (८२)
१०. भारती विद्यापीठ, पुणे (९३)
११. कॉलेज आॅफ इंजिनिअरींग, पुणे (९६)


राज्यातील अव्वल विद्यापीठे (कंसात देशातील रँकिंग)
१. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (९)
२. इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (१९)
३. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्युट (२६)
४. टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्स (३२)
५. सिम्बायोसिस विद्यापीठ (४४)
६. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (५२)
७. नरसी मोनजी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज (५५)
८. भारती विद्यापीठ (६६)
९. डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटी, कोल्हापूर (९७)

राज्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालये
१. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे (१९)
२. राजीव गांधी इन्स्टिट्युट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी, पुणे (६२)
३. सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई (७४)
४. भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फाईन आर्ट्स, पुणे (९३)

वास्तुशास्त्र, विधीमध्ये नाही
देशपातळीवरील रँकिंगमध्ये वास्तुशास्त्र आणि विधीशिक्षण या गटांमध्ये गटात राज्यातील एकाही संस्थेचा पहिल्या दहामध्ये समावेश झालेला नाही.

खासगी विद्यापीठांमध्ये सिम्बायोसिस प्रथम

‘एनआयआरएफ’च्या सर्वोत्कष्ट शैक्षणिक संस्थांच्या रँकिंगमधील खासगी विद्यापीठांमध्ये राज्यात पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर देशपातळीवरील यादीत विद्यापीठाला एकुण संस्थांमध्ये ६७ वा क्रमांक मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सिम्बायोसिसला राज्यात पाचवा क्रमांक मिळाला आहे. तसेच व्यवस्थापन आणि विधी गटामध्येही सिम्बायोसिस संस्थेने देशात अनुक्रमे १८ वा व नववा क्रमांक मिळविला आहे.

Web Title: NIRF Ranking: Mumbai IIT, Pune University top position in national ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.