लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याची गरज : तेजस्वी सातपुते 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 12:11 PM2019-02-12T12:11:39+5:302019-02-12T12:13:43+5:30

कायद्याने मुलींना संरक्षण बहाल केले आहे. त्याचा उपयोग करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे.

Need to raise voice against sexual assault: tejaswi Satpute | लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याची गरज : तेजस्वी सातपुते 

लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याची गरज : तेजस्वी सातपुते 

Next
ठळक मुद्देलोक काय म्हणतील ही भीती मनातून काढून टाका : महिला सक्षमीकरण कार्यशाळा 

पुणे : आर्थिक परिस्थिती चांगली म्हणजे महिला सक्षम आहे, असे नाही. चांगले शिक्षण घेऊन स्वत:ला घडवणे गरजेचे असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्यासाठी शिक्षण आणि ज्ञानाची गरज आहे. कायद्याविषयी जाणून घेत योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. कोणाला त्रास देण्याच्या हेतूने कायद्याकडे बघू नये. मात्र, लैंगिक अत्याचाराला बळी न पडता तात्काळ आवाज उठवण्याची हिंमत महिलांनी बाळगावी, असे मत पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी विद्यार्थिनींना दिला.
येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या महिला विकास केंद्रातर्फे संस्थेतील विद्यार्थिनींसाठी महिला सक्षमीकरण व वाहतूक जनजागृती या विषयावर आयोजित कार्यशाळेत सातपुते बोलत होत्या. यावेळी कोंढवा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सी. एम. निंबाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, कार्यशाळेचे समन्वयक व प्राचार्य डॉ. सुहास खोत, महिला विकास केंद्राच्या प्रमुख प्रा. अमृता ताकवले, प्रा. रोहिणी आगवणे, प्रा. ऋतुजा मोरे, प्रा. पूजा चौधरी आदी उपस्थित होते.
       सातपुते म्हणाले, कायद्याने मुलींना संरक्षण बहाल केले आहे. त्याचा उपयोग करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपणकर्तव्यांचे पालन करावे . लोक काय म्हणतील ही भीती मनातून काढून टाकून स्वत:ला घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. अडचणीच्या वेळी पोलीस काका, विशाखा समिती, बडी कॉपची मदत घ्यावी. वाहतुकीचे नियम पाळण्यासोबतच हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केला पाहिजे. 
या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्यार्थिनींना हेल्मेट वाटप करण्यात आले. सीएम निंबाळकर, डॉ. हेमंत अभ्यंकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. सुहास खोत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्राजक्ता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमृता ताकवले यांनी आभार मानले.

 

Web Title: Need to raise voice against sexual assault: tejaswi Satpute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.