''गांधी लढे थे गाेराेसे हम लढेंगे चाेराेसे'', राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 01:44 PM2018-07-14T13:44:31+5:302018-07-14T13:46:06+5:30

पीएमपीच्या तीन मार्गांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसच्यावतीने अांदाेलन करण्यात अाले.

ncp and congress protest against privataization of pmpml rouets | ''गांधी लढे थे गाेराेसे हम लढेंगे चाेराेसे'', राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन

''गांधी लढे थे गाेराेसे हम लढेंगे चाेराेसे'', राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन

googlenewsNext

पुणे : पीएमपीएलचे काही मार्ग हे खाजगी ठेकेदारामार्फत चालविण्यात यावेत या भाजप शहराध्यक्षांच्या भूमिकेविराेधात काॅंग्रेस अाघाडीच्या वतीने पीएमपीएलच्या मुख्यालयासमाेर अांदाेलन करण्यात अाले. यावेळी ''गांधी लढे थे गाेराे से हम लढेंगे चाेराेसे '' अश्या घाेषणा देण्यात अाल्या. यावेळी विराेधी पक्ष नेते चेतन तुपे, काॅंग्रेस गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, सुभाष जगताप, माजी महापाैर दत्तात्रय धनकवडे अादी उपस्थित हाेते. 


    सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे शहाराध्यक्ष याेगेश गाेगावले यांनी पीएमपीच्या तीन मार्गांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला अाहे. या प्रस्तावाला विराेध करण्यासाठी हे अांदाेलन करण्यात अाले. यावेळी सत्ताधारी पक्ष तसेच पीएमपीएमएल प्रशासनाविराेधात घाेषणाबाजी करण्यात अाली. तसेच फायद्यातलेच तीन मार्ग खासगीकरणासाठी का निवडण्यात अाले असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात अाला. 


    याबाबात रुपाली चाकणकर म्हणाल्या, पीएमपीचे फायद्यातील काेथरुड ते स्वारगेट, काेथरुड ते पुणे स्टेशन, वडगांवशेरी ते स्वारगेट हे तीन मार्गांचे खासगीकरणाचा प्रस्ताव भाजपशहराध्यक्ष याेगेश गाेगावले यांनी मांडला अाहे. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापाैर काही बाेलायला तयार नाहीत. लाेकांच्या सेवेसाठी हे मार्गांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. परंतु शहरातील इतर मार्ग साेडून फायद्यातल्याच मार्गांची निवड का करण्यात अाली याचा त्यांनी खुलासा करायला हवा. त्याचबराेबर सत्ताधारी पक्ष नेहमी पारदर्शक कारभाराची भाषा करत असताे तर या खासगीकरणासाठी एकाच कंपनीला टेंडर का देण्यात अाले हेही सांगायला हवे. पीएमपीने व सत्ताधारी पक्षाने हा निर्णय मागे न घेतल्यास येत्या काळात तीव्र अांदाेलन करण्यात येईल. 

Web Title: ncp and congress protest against privataization of pmpml rouets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.