राष्ट्रीय महामार्ग रोखला, १२ दिवस शेतकऱ्यांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:36 AM2018-09-22T01:36:22+5:302018-09-22T01:36:25+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ रस्ता रुंदीकरणासाठी मागील २ महिन्यांपासून शासनाची जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू

National highway has stopped for 12 days farmers' neglect | राष्ट्रीय महामार्ग रोखला, १२ दिवस शेतकऱ्यांची हेळसांड

राष्ट्रीय महामार्ग रोखला, १२ दिवस शेतकऱ्यांची हेळसांड

Next

इंदापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ रस्ता रुंदीकरणासाठी मागील २ महिन्यांपासून शासनाची जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याबाबत शासनाकडून शेतकºयांना कोणत्याही प्रकारची भूसंपादन माहिती देण्यात येत नसल्याने त्या विरोधात मागील १२ दिवसांपासून बाधित शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयासमोर शेतक-यांचे साखळी व आमरण उपोषण सुरू होते. परंतु शासनाने त्याची दखल न घेतल्याने शुक्रवारी (दि. २१) रास्ता रोको आंदोलन केले.
या वेळी आंदोलकांनी पुणे- सोलापूर महामार्गावरील पंचायत समितीसमोर ठिय्या धरत शासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. शासनाच्या धोरणावर नानासाहेब चव्हाण, बाबासाहेब भोंग यांनी आक्रमक भाषणे केली. यावेळी प्रांताधिकारी यांनी दिलेले लेखी निवेदन नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांनी कृती समितीला दिले. यावेळी कृती समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी निवेदन स्वीकारले.
या वेळी इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. या वेळी राहुल शिंगाडे, संतोष शिंदे, तेजस आदलिंग, मधुकर भोंग, बाळासाहेब घोगरे पाटील, केशव सुर्वे व मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार आदी उपस्थित होते.
>यावेळी माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे म्हणाले की, बारामती विभाग प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सोनाली मेटकरी व पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा करुन उपोषण मागे घेतले. मात्र ६0 दिवसात प्रांताधिकाºयांनी संपूर्ण माहिती देऊन, योग्य निर्णयकेला नाही तर पुढील आंदोलन आक्रमक व तीव्र असेल असे सांगण्यात आले. अ‍ॅड. राहुल मखरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी उपोषणात सक्रिय सहभाग घेतल्याने, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे यांच्या हस्ते, महासचिव संजय कांबळे, सचिव संजय शिंदे, कार्याध्यक्ष दत्तात्रय मिसाळ यांचा सत्कार केला.

Web Title: National highway has stopped for 12 days farmers' neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.