मतदार यादीत नाव नोंदवा आॅनलाईन : महिना अखेरपर्यंत संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 03:57 PM2018-10-20T15:57:16+5:302018-10-20T16:01:40+5:30

मतदार यादीत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करुन नाव नोंदविता येणार असून, मतदार अर्ज योग्य कागदपत्रांसह संबंधित विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयाकडे देखील जमा करता येईल.

Name register in voter list by online : The opportunity till the end of the month | मतदार यादीत नाव नोंदवा आॅनलाईन : महिना अखेरपर्यंत संधी

मतदार यादीत नाव नोंदवा आॅनलाईन : महिना अखेरपर्यंत संधी

Next
ठळक मुद्देगृह निर्माण संस्थांना मोहीम सहभागी होण्याचे आवाहनआगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम महिन्याच्या दर रविवारी मतदान केंद्रात, तर मंगळवारी महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी मोहीम

पुणे : मतदार यादीत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करुन नाव नोंदविता येणार असून, मतदार अर्ज योग्य कागदपत्रांसह संबंधित विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयाकडे देखील जमा करता येईल. नागरिकांनी येत्या महिना अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे. 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक शाखेतर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार या महिन्याच्या दर रविवारी मतदान केंद्रात, तर मंगळवारी महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या शिवाय गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना देखील मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करण्यात आले आहे. तसेच त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गृह निर्माण संस्थांमधील मतदार नोदंणी, नावातील बदल, मयत व्यक्तींची नावे वगळणे, नावातील चुकीची दुरुस्ती करणे आणि स्थलांतरीतांची नावे कळवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. 
नागरिकांना एनव्हीएसपी डॉट इन या संकेतस्थळावर मतदार नोंदणीचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे देखील दाखल करता येतील. तसेच विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज आणि कागदपत्रे भरुन नाव नोंदणी, पत्ता बदल, नावातील दुरुस्ती अथवा बदल करुन घेता येणार आहे. या महिना अखेरी पर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे. गृह निर्माण संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिवांना १८ ते १९ वयोगटातील मतदारांची नाव नोंदणी करण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे. या शिवाय दिव्यांग व्यक्तींची माहिती देखील संस्थांनी द्यावी. त्यामुळे दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी आणि सुविधा देणे प्रशासनाला शक्य होईल. संबंधित गृह संस्थेतून स्थलांतरीत झालेल्या व्यक्तींची देखील नावे कळवावित असे आवाहन निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. 
---------------
कागदपत्रे 
ुवयाचा पुरावा : जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेची नोंद असलेली गुणपत्रिका, पासपोर्ट, वाहन परवाना, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक.
रहिवासी पुरावा : शिधापत्रिका, बँक आणि पोस्ट पासबुक, पासपोर्ट, वाहन परवाना, नजीकच्या महिन्याचे टेलिफोन अथवा वीज बिल, पासपोर्ट, आधारकार्ड या पैकी कोणतेही एक. आॅनलाईन मतदार नोंदणीसाठी अर्जदाराचे छायाचित्र २ एमबी पेक्षा जास्त नसावे. 

Web Title: Name register in voter list by online : The opportunity till the end of the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.