नगरपालिका निवडणुकीचे पडघम, अध्यक्षपद महिलेसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:31 AM2018-05-05T03:31:21+5:302018-05-05T03:31:21+5:30

भोर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले असून, निवडणूक आयोगाने पूर्वीच्या ४ ऐवजी २ प्रभाग करून प्रभाग रचना केली आहे. याची आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. यामुळे आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा पक्षातील सर्व इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.

Nagarpalika elections fall, preserved for women | नगरपालिका निवडणुकीचे पडघम, अध्यक्षपद महिलेसाठी राखीव

नगरपालिका निवडणुकीचे पडघम, अध्यक्षपद महिलेसाठी राखीव

googlenewsNext

भोर - भोर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले असून, निवडणूक आयोगाने पूर्वीच्या ४ ऐवजी २ प्रभाग करून प्रभाग रचना केली आहे. याची आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. यामुळे आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा पक्षातील सर्व इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.
भोर शहरातील नगरपालिकेच्या ८ प्रभागांतील १७ जागांपैकी ९ महिला आणि नगराध्यक्ष एक अशा १० महिलांना संधी मिळणार असल्यामुळे पालिकेवर पुन्हा एकदा महिलाराज येणार आहे. भोर शहराच्या २०११च्या जनगणनेवर आधारित लोकसंख्येवर ही निवडणूक होणार आहे. हरकती सूचनांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडे ३ मेपर्यंत अभिप्राय पाठविण्यात आला आहे. त्या नुसार विभागीय आयुक्त प्रभागरचनेला ८ मे रोजी अंतिम मंजुरी देतील. भोर शहराची लोकसंख्या २० हजाराच्या आसपास असून, सरासरी १३ हजार मतदार आहेत. यात शहरातील चार ते पाच झोपडपट्ट्यांचा समावेश आहे.
२२ जुलै २०१८मध्ये भोर नगरपालिकेची मदत संपत असल्याने नवीन निवडणुक जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी आपआपल्या पक्षाकडे जोर लावला आहे. फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आणि भेटीगाठी घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, अनेकांच्या प्रभागात बदल झाल्यामुळे दुसऱ्या प्रभागातून लढावे लागणार असल्यामुळे तसा प्रयत्न सुरु आहे. तर प्रभागात असलेल्या दोन जागांवर एकत्र येऊन लढण्यासाठी इच्छुक उमेदवार चाचपणी करीत आहेत. उमेदवारीसाठी वेळप्रसंगी पक्षांतरे होतील अशीही चर्चा आहे. सन २०१३च्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली भोर नगरपालिकेत १७ पैकी १३ नगरसेवक काँग्रेसचे विजयी झाले. या वेळी काँग्रेसची सत्ता आली होती, तर ४ नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले. सेना व भाजपाचा एकही नगरसेवक विजयी झाला नाही. सध्याचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.

शासनाने नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा आहे. यापूर्वी अमृतलाल रावळ व चंद्रकांत सागळे हे थेट जनतेतून निवडून आले होते. त्याला १५ वर्षे झाली. त्यानंतर पुन्हा थेट नगराध्यक्ष निवडणूक होत आहे. यामुळे सर्वच पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पूर्वीचे ४ चे २ प्रभाग करताना अनेक प्रभाग विभागले गेले असून, नवीन प्रभाग तयार झाल्याने अनेकांची दमछाक होणार आहे. उमेदवारीसाठी काही जण पक्षांतर करण्याची शक्यता आहे. सध्या भोर शहरातील चौकाचौकात आणि ाल्ल्यागल्ल्यांत कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाला मिळणार नाही, नगरसेवक व नगराध्यक्ष कोण होणार, याचीच चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

भोर नगरपालिका प्रभागरचना व आरक्षण :

प्रभाग क्र. १ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव. प्रभाग क्र. १ ब सर्वसाधारण. प्रभाग क्र. २ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. २ ब सर्वसाधारण (महिला). प्रभाग क्र. ३ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ३ ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ४ अ अनुसूचित जाती जमाती (महिला) राखीव, प्रभाग क्र. ४ ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ अ नाग्ािरकांचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव, प्रभाग क्र. ५ ब सर्वसाधारण प्रभाग, क्र. ६ अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ६ ब सर्वसाधारण.

प्रभाग क्र. ७ अ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ७ ब सर्वसाधारण, प्रभाग
क्र. ८ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग
(महिला) राखीव, प्रभाग क्र. ८ ब सर्वसाधारण (महिला) राखीव,
प्रभाग क्र. ८ क सर्वसाधारण, असे आरक्षण राहणार आहे.

नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, ते थेट जनतेतून निवडून द्यायचे आहे. त्यामुळे पालिकेत ५ सर्वसाधारण महिला, तर एक अनुसूचित जाती जमाती महिला व ३ नागरिकांचा मागास प्रवर्गातील अशा ९ महिला आणि नगराध्यक्ष मिळून १० महिला असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २ जागा असून, ६ सर्वसाधारण पुरुष राहणार आहेत.

Web Title: Nagarpalika elections fall, preserved for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.