डासाेत्पत्ती अाढळलेल्या मिळकतींना 25 हजाराहून अधिक दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:35 PM2018-06-30T18:35:51+5:302018-06-30T18:37:09+5:30

गेल्या अाठवड्यात महापालिकेने एकूण 25 हजाराहून अधिक दंड विविध मिळकतींना ठाेठावला अाहे. तर जून महिन्यात 22 जून पर्यंत 1 हजार नऊशे 15 खासगी तर 660 सार्वजनिक ठिकाणी डासांची उत्पत्ती महापालिकेला अाढळली अाहे.

More than 25 thousand penalties for private places where dengue mosquto found | डासाेत्पत्ती अाढळलेल्या मिळकतींना 25 हजाराहून अधिक दंड

डासाेत्पत्ती अाढळलेल्या मिळकतींना 25 हजाराहून अधिक दंड

Next

पुणे :  पावसाळा सुरु झाल्याने पाणी साठून विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती हाेत अाहे. पुणे महानगरपालिकेकडून खासगी ठिकाणी पाणी साठून त्यात डासांची उत्पत्ती हाेणार नाही याची काळजी घेण्याचे अावाहन करण्यात येते. गेल्या अाठवड्यात महापालिकेने एकूण 25 हजाराहून अधिक दंड विविध मिळकतींना ठाेठावला अाहे. तर जून महिन्यात 22 जून पर्यंत 1 हजार नऊशे 15 खासगी तर 660 सार्वजनिक ठिकाणी डासांची उत्पत्ती महापालिकेला अाढळली अाहे. 

    पावसाळा सुरु झाला की डासांची उत्पत्ती माेठ्याप्रमाणावर वाढते. तसेच या काळात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या राेगांच्या पेशंटचीही संख्या वाढत असते. साठलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती असते. घरात साठवून ठेवलेले पाणी, घराच्या छतावर ठेवलेले टायर, शहाळी यांच्यामध्ये साठलेल्या पाण्यातही डासांची उत्पत्ती हाेत असते. त्यामुळे अापल्या अाजूबाजूला पाणी साठून डासांची उत्पत्ती हाेणार नाही याची काळजी घेण्याचे अावाहन पालिकेकडून करण्यता येते. त्याचबराेबर ज्या खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तांच्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती अाढळते अश्या मालमत्तांवर पालिकेकडून दंड स्वरुपात कारवाई करण्यात येते. या अाठवड्यात केलेल्या कारवाईत महापालिकेने विविध मिळकतींना एकू्ण 25 हजारांहून अधिक दंड अाकारला अाहे. त्याचबराेबर 1 जून ते 22 जून पर्यंत 1 हजार नऊशे 15 खासगी तर 660 सार्वजनिक ठिकाणी डासांची उत्पत्ती महापालिकेला अाढळली अाहे. पालिकेने 1 हजार चारशे 72 मिळकतींना नाेटीसाही पाठविल्या असून जनजागृती करणारी 1 लाख 73 हजार चारशे 64 पत्रके वाटण्यात अाली अाहेत. 

    याबाबत बाेलताना महापालिकेचे सहाय्यक अाराेग्य अधिकारी डाॅ. संजय वावरे म्हणाले, डेंग्यू, मलेरिया अादी अाजाराच्या डासांची उत्पत्ती कशी हाेते, या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत अाहे. त्याचबराेबर जनजागृतीपर पत्रकेही वाटण्यात येत अाहे. गेल्या अाठवड्याभरात 25 हजाराहून अधिक दंड विविध मिळकतींना ठाेठावला अाहे. अापल्या अाजूबाजूला डासांची उत्पत्ती हाेणार नाही याची काळजी नागरिकांनी घेणे अावश्यक अाहे.  

Web Title: More than 25 thousand penalties for private places where dengue mosquto found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.