तुम्हालापण पुण्याविषयी हे गैरसमज आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 05:43 PM2017-11-24T17:43:16+5:302017-11-24T18:07:48+5:30

पुण्यात बऱ्याच अश्या गोष्टी आहेत ज्यांबाबत आपण जास्त काही बोलत नाही. पण खरंच पुण्यात या गोष्टी आहेत.

misbelieves about pune | तुम्हालापण पुण्याविषयी हे गैरसमज आहेत का?

तुम्हालापण पुण्याविषयी हे गैरसमज आहेत का?

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील एक महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जात असलं तरी परगावची रहिवासीसुध्दा आहेत. पुण्यात अनेक महाविद्यालये असून ती इथंच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहेत. पुण्याच्या गल्ल्या-गल्ल्या आणि हायवे वरच्या ट्राफीकसाठीही प्रसिध्द आहे.

पुणे : पुणे म्हणजेच माज. माज परंपरेचा, माज पेशवाईचा, माज कला-संस्कृतीचा, माज बाणेदारपणाचा, माज थोरा-मोठ्यांच्या आदराचा, माज वारसा जपणाऱ्यांचा, माज शिक्षणाचा, माज खव्वयेगिरीचा, माज नवीन फॅशनचा, माज जुने न सोडण्याचा पण नाविण्याला साकारण्याचा, माज सगळ्यांना आपलेसे करण्याचा, माज शिस्तीचा, अशा विविध विशेषणांनी आपण पुण्याला ओळखतो. पुणे तिथे काय उणे असंही आपण म्हणतो. पण पुणेकरांविषयी अनेक गोड गैरसमजही पसरवण्यात आले आहेत. हे गैरसमज अगदी पुणेरी पाट्यांपासून ते पुणेरी रस्त्यांपर्यंत साऱ्याविषयी पसरलेले आहेत. मुंबई किंवा पुणे शहराच्या बाहेर राहणाऱ्यांमध्ये पुण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. अशाच काही चुकीच्या समजुतींविषयी आज आपण पाहुया. 

पुणेरी पाट्या

पुणेकर सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले ते त्यांच्या पाट्यांमुळे. या पाट्यांना फार विनोदी छटा असते. मधल्या काही वर्षात समाज माध्यमं वाढत गेल्याने या पाट्यांना फार प्रसिद्धी मिळत गेली. अनेक चित्रपटांच्या माध्यमातूनही या पाट्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत गेल्या. असं म्हणतात की संपूर्ण पुण्यात या पाट्या लावलेल्या आढळतात. कोणाच्या दुकानाबाहेर, घराबाहेर, रस्त्यावर, लग्नसोहळ्यात आणि अगदी लग्न पत्रिकेतही विनोदी सुचना लिहिलेल्या आढळतात. पण एक गोष्ट तुम्हाला माहितेय का? या पुणेरी पाट्यांना फार जुना इतिहास आहे. या पाट्या आता जन्माला आल्या आहेत, अशातला भाग नाही. त्यामुळे अशा पाट्या किंवा विनोदी सुचना तुम्हाला फक्त पुण्यातील जुन्या घराबाहेर किंवा जुन्या रस्त्यांवरच आढळतील. बाणेर, खराडी, औंध, विमान नगर आणि कोरेगाव पार्क अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला या पाट्या आढळणार नाहीत. कारण ही ठिकाणं शहर म्हणून नव्याने जन्माला येताएत आणि पाट्यांचे पुरावे तुम्हाला केवळ जुन्या पुण्यातच आढळून येतील. 

आणखी वाचा -  नोटाबंदीदरम्यान असलेल्या या पुणेरी पाट्या

अरुंद रस्ते

पुण्यात अनेक लहान लहान गल्ल्या आहेत असं समजलं जातं. या लहान लहान गल्ल्यांमुळेच पुण्याची एक वेगळी ओळख आहे. मात्र पुण्यात सर्वच ठिकाणी अशा गल्ल्या आढळून येत नाहीत. कल्याणी नगर, बाणेर, बावधान, औंध आणि कोरेगाव पार्क या ठिकाणी तुम्ही गेलात तर लांब लचक रस्ते पाहायला मिळतील. त्यामुळे पुण्यातील अरुंद रस्त्यांसाठी ही ठिकाणं अपवाद आहेत. 

सिम्बॉसिस कॉलेज इज बेस्ट

सिम्बॉसिस कॉलेज हे उत्तमच आहे, यात काहीच वाद नाही. मात्र पुण्यात हेच एकमेव कॉलेज बेस्ट नसून इतर अनेक महाविद्यालये इथं प्रसिद्ध आहेत. फर्ग्यूसन कॉलेजविषयी तर तुम्हाला सांगायलाच नको. अनेक नामवंत कलाकार याच कॉलेजमधून बाहेर पडली आहेत. शिवाय अनेक अभियांत्रिकी महाविद्यलयही इथं फार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना शिकवण्याची, त्यांना घडवण्याची एक वेगळी पद्धत आहे. तसंच महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांमुळेही काही महाविद्यालय प्रसिद्ध आहेत. त्यामुळे केवळ सिम्बॉसिस हेच महाविद्यालय इथं प्रसिद्ध नसून इतर अनेक महाविद्यालय विद्यार्थ्यांची फेव्हरिट आहेत. 

आणखी वाचा - पुण्यात स्टार्टअपला मिळतेय चालना, विद्यार्थाही मिळवताहेत अनुभव

आणखी वाचा - होय मला पुण्याचा खुप राग येतो

मराठी भाषिक पुणेकर

महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जात असलं तरी इथं परप्रांतियांची वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. अनेक कंपन्यांनी आपले बस्तान पुण्यात बसवल्याने नोकरीच्या शोधात अनेक परपांत्रिय पुण्यातही पसरले. मुंबईवर ज्याप्रमाणे इतर राज्यातील लोकांनी कब्जा मिळवला त्याचप्रमाणे पुण्यावरही परपांत्रियांनी घुसखोरी केलेली आहे. म्हणजेच पुणं हे केवळ मराठी भाषिकांचं शहर राहिलं नसून कॉस्मोपॉलिटन शहर बनलं आहे. 

पुण्यासंदर्भात आणखी बातम्यांसाठी येथे क्लिक करा

 

Web Title: misbelieves about pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.