मिलिंद एकबोटे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:19 PM2018-03-21T16:19:25+5:302018-03-21T16:19:25+5:30

बुधवारी कोरेगाव-भीमा प्रकरणात मिलिंद रमाकांत एकबोटे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Milind Ekbote gets 14-day judicial custody | मिलिंद एकबोटे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

मिलिंद एकबोटे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

Next
ठळक मुद्देकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण

पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पोलीस कोठडीत असलेले समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय ६१, रा. शिवाजीनगर) यांना १४ दिवसांची न्यायालयान कोठडी सुनावण्यात आली आहे. एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 
कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप एकबोटेंवर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटेंना अटक केली होती. दरम्यान, १९ मार्चला त्यांना विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलीस कोठडीसाठी चालविले होते. न्यायालयाच्या बाहेर पडताच दोन मिनिटाच्या कालावधीतच वकीलाच्या वेशात असलेल्या गनिमीकावा प्रतिष्ठानचा संस्थापक संजय वाघमारे याने एकबोटेंवर शाई फेक केली होती. याप्रकरणी वाघमारे याच्यासह तीन जणांना पोलीस २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Milind Ekbote gets 14-day judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.