Measures for eighth student marine pollution | आठवीच्या विद्यार्थ्याचा सागरी प्रदूषणावर उपाय
आठवीच्या विद्यार्थ्याचा सागरी प्रदूषणावर उपाय

पुणे : सागरी प्रदूषणावरील माहितीपट पाहून अस्वस्थ झालेल्या पुण्यातील हाजिक काझी या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने हे प्रदूषण दूर करण्यास उपयुक्त ठरू शकेल, अशा जहाजाचे मॉडेल तयार केले आहे.
वाघोली येथील इंड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो शिकतो. समुद्रामध्ये दररोज लाखो टन कचरा फेकला जातो. या कचऱ्याचा सागरी, मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो. यावरील माहितीपट पाहून तो अस्वस्थ झाला. त्यातून सागरामधून वाहतूक करणाºया जहाजांद्वारेच ही समस्या दूर करता येऊ शकेल, अशी कल्पना त्याला सुचली.
याबाबत इंटरनेटवरून बरीच माहिती गोळा केली, तसेच पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षकांशी चर्चा करून त्याने सागरी प्रदूषण दूर करणारे जहाजाचे मॉडेल तयार केले. त्याला त्याने ‘ईआरव्हीआयएस’ असे नाव दिले. हाजिकने बनविलेल्या या मॉडेलचे टेड-६ आणि टेड-८ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सादरीकरण केले आहे. सागरी प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम समाज जीवनावर होत आहेत. याला अटकाव करण्यासाठी प्रदूषण रोखणाºया जहाजाच्या मॉडेलची कल्पना मला सुचली.
- हाजिक काजी, विद्यार्थी,
इंडस इंटरनॅशनल स्कूल, पुणे.
>असे असेल जहाज
जहाजात एक ‘इर्विस सेंट्रिपेटल फोर्स’ नावाची यंत्रणा बसविलेली असेल. ही यंत्रणा समुद्रातील पाणी खेचून घेईल व पाणी, समुद्री जीव आणि कचरा यांचे वर्गीकरण करेल. पाणी व सागरी जीव पुन्हा समुद्रात सोडले जातील. कचरा मात्र गोळा केला जाईल. कचºयाचे प्लॅस्टिक, लाकूड, धातूच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाईल. जहाज किनाºयावर आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल.

Web Title: Measures for eighth student marine pollution
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

ताजा खबरें

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

6 minutes ago

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

8 minutes ago

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

13 minutes ago

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

15 minutes ago

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

15 minutes ago

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

16 minutes ago

पुणे अधिक बातम्या

वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त

वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त

8 hours ago

जेजुरी येथील नाझरे जलाशयात बुडून तरुणाचा मृत्यू

जेजुरी येथील नाझरे जलाशयात बुडून तरुणाचा मृत्यू

9 hours ago

‘जेट एअरवेज ’ची जागा घेणार दुसऱ्या कंपन्या

‘जेट एअरवेज ’ची जागा घेणार दुसऱ्या कंपन्या

9 hours ago

वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक

वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक

9 hours ago

मुळावरच घाव घालण्यासाठी बारामतीची लढाई : अमित शाह 

मुळावरच घाव घालण्यासाठी बारामतीची लढाई : अमित शाह 

12 hours ago

तुकाराम मुंढे यांच्या काळातही होती पीएमपीत अनियमितता

तुकाराम मुंढे यांच्या काळातही होती पीएमपीत अनियमितता

10 hours ago