गणेशोत्सवातील ९७ टन निर्माल्यापासून खत निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 07:20 PM2018-09-24T19:20:26+5:302018-09-24T19:31:15+5:30

गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ  संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे.

Manufacturing of fertilizers from 97 tons nirmlaya in ganeshotsav | गणेशोत्सवातील ९७ टन निर्माल्यापासून खत निर्मिती

गणेशोत्सवातील ९७ टन निर्माल्यापासून खत निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका हद्दीत ३० हजार ८०६ मूर्त्या तर पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार ९२४ मूर्त्या टाक्यांमध्ये विसर्जित गेल्या तीन वर्षांपासून शहरात निर्माल्यपासून खत निर्मिती

पुणे : गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ  संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे. यापासून संस्थेच्या वतीने खत निर्मिती करण्यात येणार आहे. तर यामध्ये गोळा झालेला २४ टन पेक्षा अधिक सुका कचरा पुनर्निर्माण व प्रक्रियेसाठी पाठविणार आहे.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्यासाठी विसर्जन घाटावर स्वतंत्र व्यवस्था केली. याशिवाय जास्तीत जास्त नागरिकांना गणेश मूर्त्यांचे महापालिकेच्या विसर्जन हौद व टाक्यांमध्ये विसर्जन करण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे महापालिका हद्दीत ३० हजार ८०६ मूर्त्या तर पिंपरी-चिंचवड हद्दीत २ हजार ९२४ मूर्त्या टाक्यांमध्ये विसर्जित करून घेण्यात आल्या. यासाठी स्वच्छ संस्थेचे ६० कर्मचारी आणि १५० हून अधिक स्वयंसेवक या मोहिमेमध्ये सहभागी झाले. गेल्या काही वर्षांत नदी, तलाठ, कॅनोल ऐवजी विसर्जन हौद, टाक्यांमध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे प्रमाण वाढले आहे. निर्माल्य देखील नदीत न टाकता नागरिकांकडून निर्मल कलश, पालिकेचे कर्मचारी, स्वसंसेवक, स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडे देण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरात निर्माल्यपासून तयार करण्यात येणाऱ्या खताचे गोविज्ञान संस्थेच्या मदतीने जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांना वाटप करण्यात येते.      

Web Title: Manufacturing of fertilizers from 97 tons nirmlaya in ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.