मंत्रोपचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:22 AM2018-03-16T00:22:42+5:302018-03-16T00:22:42+5:30

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णावर उतारा करणाºया मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली.

Mantra arrested, 3 days police custody | मंत्रोपचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी

मंत्रोपचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी

Next

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णावर उतारा करणाºया मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण हा अजूनही फरार आहे.
सचिन सदाशिव येरवडेकर (वय ४८, कसबा पेठ) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. अंधश्रद्धेला चालना दिल्याप्रकरणी डॉ. चव्हाण याच्यावरही गुन्हा दाखल आहे. संध्या गणेश सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय २२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २० फेब्रुवारी ते ११ मार्च २०१८ या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. संध्या यांच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी झाल्या होत्या. हे आॅपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला.
येरवडेकर याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्या वेळी मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण याच्या शोधासाठी आणि येरवडेकर मांत्रिक आहे. त्याने अशा प्रकारचे अन्य गुन्हे केले आहेत का, याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली.

Web Title: Mantra arrested, 3 days police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक