अनुसूचित जाती वर्गातून माधुरी तिखे राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:09 PM2018-05-31T21:09:56+5:302018-05-31T21:09:56+5:30

आयुष्यात चांगले काहीतरी करायचे या ध्येयानेच अभ्यास करत राहिले. आईची मेहनत आणि माझे कष्ट यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविता आले.

madhuri tikhe first in Scheduled caste at state | अनुसूचित जाती वर्गातून माधुरी तिखे राज्यात प्रथम

अनुसूचित जाती वर्गातून माधुरी तिखे राज्यात प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदारपदी निवड : प्रतिकूल परिस्थितीत मिळवले उज्ज्वल यशआयआयटी गुवाहाटी येथून बी. टेक इंजिनिअरिंग पूर्ण२०१५ साली राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करण्यासाठी पुण्यात प्रज्ञावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश

पुणे : चौथीत असताना वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बिकट होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत आईने संघर्ष करत भावाबरोबर मला चांगले शिक्षण दिले. आयुष्यात चांगले काहीतरी करायचे या ध्येयानेच अभ्यास करत राहिले. आईची मेहनत आणि माझे कष्ट यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती वर्गातून मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळाला असल्याचे तहसीलदारपदी निवड झालेल्या माधुरी तिखे हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
माधुरी तिखे मूळची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चांदगावची. आई नगरपरिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका होती. त्यामुळे तिचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण श्रीगोंदा येथे, तर सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये झाले. तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण बॅँगलोर येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. या दोन वर्षांदरम्यान तिला दक्षिणा फौऊंडेशनची बी. टेकसाठी शैक्षणिक स्कॉलरशिप मिळाली. दोन वर्षे तिला बी. टेकचे मोफत मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे २०११ साली आयआयटी गुवाहाटी येथे पदवी शिक्षणासाठी तिची निवड झाली. आयआयटी गुवाहाटी येथून बी. टेक (इंजिनिअरिंग) पूर्ण केले. त्यानंतर २०१५ साली राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करण्यासाठी पुण्यात प्रज्ञावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेतला. मागील तीन वर्षांत स्पर्धा परीक्षेची कसून तयारी केल्याने पहिल्या प्रयत्नातच अनुसूचित जाती वर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळाला. 
.......................
नोटस, गट चर्चा, सराव परीक्षेमुळे यश
क्लासमध्ये शिकवत असताना नोटस काढणे, चार जणांचा ग्रुप तयार करून वेगवेगळ्या विषयांवर गट चर्चा  करणे, ठराविक कालावधीत टेस्ट सिरीजचा सराव केला. तसेच मागील काही वर्षातील आयोगाच्या परीक्षांचे पेपर सोडवत राहिले. त्यामुळे दरवर्षी विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांचा कल लक्षात आला. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यामुळे दुसऱ्या प्रयत्नात तहसीलदारपदी निवड झाल्याचे माधुरी तिखे हिने सांगितले.

Web Title: madhuri tikhe first in Scheduled caste at state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.