ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी उलगडलं संगीत क्षेत्रावरील प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 02:40 PM2017-09-08T14:40:38+5:302017-09-08T14:41:14+5:30

भिजात संगीत हीच माझी संपत्ती आणि स्वर हेच माझं ईश्वर आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी संगीतावरील प्रेम उलगडलं.

The love of the music field highlighted by senior sarod maestro Ustad Amjad Ali Khan | ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी उलगडलं संगीत क्षेत्रावरील प्रेम

ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी उलगडलं संगीत क्षेत्रावरील प्रेम

googlenewsNext
ठळक मुद्देभिजात संगीत हीच माझी संपत्ती आणि स्वर हेच माझं ईश्वर आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी संगीतावरील प्रेम उलगडलंपाचव्या पुणे लिटररी फेस्टिव्हलचं शुक्रवारी यशदामध्ये अमजद अली खाँ यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालं.

पुणे, दि.8 - संगीत आणि भाषेचं जग खूप सुंदर आहे. भाषा प्रत्येकाला समजून घेता येतात. संगीत मात्र मोजक्या लोकानाच कळतं. गुरुंच्या आशीर्वादाने मला संगीताच्या दुनियेत रमण्याचं भाग्य लाभलं. एका आयुष्यात आपल्याला सर्व काही करता येत नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीची निवड कराविच लागते, असं वडिलांनी सांगितलं होतं. मी संगीताची निवड केली. अभिजात संगीत हीच माझी संपत्ती आणि स्वर हेच माझं ईश्वर आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी संगीतावरील प्रेम उलगडलं.

पाचव्या पुणे लिटररी फेस्टिव्हलचं शुक्रवारी यशदामध्ये अमजद अली खाँ यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालं. यावेळी विश्वनाथ कराड, निल अलाँडो, अशोक चोप्रा, भरत अगरवाल, मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते.

मुख्य व्यासपीठावर किरकोळ शॉर्टसर्किट
फेस्टिवहलच्या उद्घाटनादरम्यान मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला वायर जळल्याने किरकोळ शार्ट सर्किट झाले. त्यांमुळे काही काळ तांत्रिक बिघाड उतपन्न झाला. तसंच, भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही क्षणामध्ये बिघाड दुरुस्त करण्यात आला.

Web Title: The love of the music field highlighted by senior sarod maestro Ustad Amjad Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत