कमळाच्या पाकळीत मिटले धनुष्य! शिवसेना-भाजपाची ‘संधिसाधू युती’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 01:39 AM2019-02-19T01:39:44+5:302019-02-19T01:40:07+5:30

सोशल माध्यमातून दोन्ही पक्षांवर टीका : शिवसेना-भाजपाची ‘संधिसाधू युती’

Lotus bowl bowl! Shiv Sena-BJP combine alliance | कमळाच्या पाकळीत मिटले धनुष्य! शिवसेना-भाजपाची ‘संधिसाधू युती’

कमळाच्या पाकळीत मिटले धनुष्य! शिवसेना-भाजपाची ‘संधिसाधू युती’

googlenewsNext

पुणे : उष:काल होता होता पुन्हा ‘युती’ झाली, कमळाच्या पाकळीत मिटले धनुष्य यापुढे सत्ता हेच लक्ष्य, अफजल, कुंभकर्ण, थापाडे आले सारे एकत्र, उद्धवजी कितना भी समेट लो हाथों से फिसलता जरूर है, ये वक्त बदलता जरूर है, शिवसेना-भाजपाची ‘संधिसाधू’ युती अशा शेलक्या विशेषणांनी दोन्ही पक्षांवर कडाडून टीका सोशल माध्यमांवर होत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेला २३ तर भाजपाला २५ असे गणित मांडत निवडणुकीला सामोरे जायचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. मात्र यावर नागरिकांनी दोन्ही पक्षांवर जोरदारपणे ‘ट्रोलिंग’ करण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी मुंबईत भाजपा आणि शिवसेना यांच्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संयुक्तिक पत्रकार परिषद पार पडली. दुसऱ्या बाजूला ती परिषद होत असताना त्यात होणाºया निर्णयांचे पडसाद फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरवर उमटायला सुरुवात झाली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच शिवसेना आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर टीका करण्यात आली. बीजेपी सेना युती अशी गाजली का तिच्यापुढे लाजसुद्धा लाजेने लाजली, पहले मंदिर फिर सरकार हा नारा ठेवलाय गुंडाळून नुसती आश्वासनेच दिल्याने जनता गेली कंटाळून, अवनीनंतर महाराष्ट्रात आणखी एका ‘वाघाची’ शिकार, यापूर्वी शिवसेना आणि भाजपा यांच्यात झालेल्या कमालीच्या संघर्षाने आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची काय भूमिका असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या माध्यमांतून एकमेकांवर टीकेची झोड उठवत असताना
दुसºया बाजूला हातात हात घालून निवडणूक लढविण्याच्या गोष्टी करत आहेत. असे दिसू लागल्यानंतर नागरिकांनी दोन्ही पक्षांनी आतापर्यंत एकमेकांवर केलेल्या टीकेची उदाहरणे देण्यास सुरुवात केली आहे. काहीही झाले तरी यंदाच्या निवडणुकीत शिवसेना - भाजपा यांच्यात एकमत होणार नाही. हे दोन्ही पक्ष स्वतंत्ररीत्या लढतील. अशाप्रकारच्या राजकीय चर्चांना उधाण आले असताना दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी घेतलेल्या परिषदेनंतर नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था त्यांनी सोशल माध्यमांमध्ये व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून पाहावयास मिळत आहे.

दिलजमाईचा समाचार...
जे पक्ष एकमेकांना पाण्यात पाहत होते त्यांच्यात झालेल्या या ‘दिलजमाई’चा फेसबुक, ट्विटरवर नागरिकांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. ‘आम्ही सत्तेला लाथ मारू’ या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली राजकारण म्हणजे काय असतं आज कडू तर उद्या गोड होणं असतं, आम्ही भावनेचा नव्हे ‘सत्तेचा’ विचार करतो. कोणे एकेकाळी शिवसेनेचा वाघ गुरगुर करायचा, तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना, ‘हम’ सब ‘एक’ है

Web Title: Lotus bowl bowl! Shiv Sena-BJP combine alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.