शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 03:40 PM2024-02-08T15:40:12+5:302024-02-08T15:41:02+5:30

आपल्याला भाजपची मते मिळून निवडून येऊ असे कुणी स्वप्न पाहत असेल तर त्यांनी अजून भाजपला ओळखले नाही

Kolhe from Shirur Lok Sabha and Jagtap from Hadapsar Assembly Jayant Patil spoke clearly | शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले

शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले

हडपसर: हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे केवळ दोन हजार 300 मताधिक्याने विजयी झाले. या मतदारसंघातील पक्ष संघटित ठेवणे त्यांनी अपेक्षित होते. पण तसे घडले नाही. आपल्याला भाजपची मते मिळून निवडून येऊ असे कुणी स्वप्न पाहत असेल तर त्यांनी अजून भाजपला ओळखले नाही. अशी तुपे यांच्यावर टीका करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार निवडून शंभर टक्के यशस्वी होऊ असा विश्वास प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विजय निश्चित मेळावा येथील नेताजी सुभाष मंगल कार्यालयात आयोजित केला होता.  त्यावेळी ते बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा लोकसभेत व हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. 

लोकसभा व विधानसभेचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर करत प्रंचड मोठी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र, पक्षाची पडझड होत असताना प्रशांत जगताप ठामपणे शरद पवारांच्या मागे उभे राहिले .असे पाटील म्हणाले. फूट पडण्याआधी जगताप हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. फूटीनंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्षपदी त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले. मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी त्याला उल्लेख करत विधानसभेच्या उमेदवारीबाबतही सूचक विधान केले. त्यामुळे हडपसरमध्ये चेतन तुपे विरूध्द प्रशांत जगताप हे सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Kolhe from Shirur Lok Sabha and Jagtap from Hadapsar Assembly Jayant Patil spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.