सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 07:16 PM2019-01-28T19:16:12+5:302019-01-28T19:17:58+5:30

जम्मू-काश्मीरचे सांस्कृतिक संचित, परंपरा, तसेच चित्रपटांमधून होणारे तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन याबद्दल सामान्यांना कमालीचे कुतूहल असते.

Jammu-kashmir Cultural front in Film Festival by sarhad | सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव

सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देकाश्मीरविषयी अथवा काश्मीरी कलाकारांचा सहभाग असणारे चित्रपट यात दाखवले जाणार

पुणे : जम्मू-काश्मीरचे सांस्कृतिक संचित, परंपरा, तसेच चित्रपटांमधून होणारे तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन याबद्दल सामान्यांना कमालीचे कुतूहल असते. सामान्यांना याबाबत विविध बाबी जाणून घेण्याच्या उद्देशाने सरहदच्या वतीने यंदाच्या वर्षी जम्मू काश्मीर सांस्कृतिक महोत्सव तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीर सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात १९९७ साली झाली. मधल्या काळात ताणतणावाच्या परिस्थितीमुळे तेथील कलाकार उपस्थित राहू शकले नव्हते. यंदाचा काश्मीर महोत्सव सरहद आणि अर्हम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, ‘बाँडिंग विथ काश्मीर’ अशी महोत्सवाची कल्पना आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी ४ वाजता महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. ज्यांनी हिंसाचार पाहिला, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती दहशतवादी हल्लयात मारल्या गेल्या, अशा तरुणांच्या ‘गाश बँड’चे सादरीकरण होणार आहे. आएएसमध्ये प्रथम येऊनही ज्याने प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन सामाजिक-राजकीय क्षेत्रात येण्याचा निश्चय केला, ज्याच्या वडिलांना अतिरेक्यांनी ठार मारले, अशा डॉ. शाह फैजल या तरुणाची महोत्सवास विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी तो भविष्यातील भूमिकाही स्पष्ट करणार आहे.
--------
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
सरहदच्या वतीने जम्मू काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. एफटीआयआय आणि एनएफएआय यांच्या सहकार्याने महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काश्मीरविषयी अथवा काश्मीरी कलाकारांचा सहभाग असणारे चित्रपट यात दाखवले जाणार आहेत. एनएफ एआयमध्ये होणा-या या महोत्सवासाठी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिक, राज्यपालांचे सल्लागार खुर्शिद अहमद गनाई, काश्मीरमध्ये मल्टिप्लेक्स उभारणारे विजय धर, तसेच विविध चित्रपट निर्माते, कलाकार यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि महोत्सवाचे संचालक मुश्ताक अली यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Jammu-kashmir Cultural front in Film Festival by sarhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.