म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसेसुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 06:40 PM2018-06-10T18:40:30+5:302018-06-10T18:40:30+5:30

मोदी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे म्हणाले होते, परंतु 15 पैसेसुद्धा कोणाच्या खात्यात आले नाहीत. 

It is said that 15 lakhs will come to everybody's account, 15 paise has not been received, Dhananjay Munde criticized Modi | म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसेसुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका

म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसेसुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका

Next

पुणे- येत्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. या सत्तांतारात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष असेल, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या 19व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बोलत होते. 
सबका साथ सबका विकास या भाजपाच्या घोषणेवर मोठी टीका झाल्याने साफ नियत साफ विकास अशी जाहिरात आता भाजपा करतेय. परंतु आश्वासनं देऊन ती पूर्ण न केल्याने मोदींची साफ नियत नसल्याचे दिसून येते. मोदी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे म्हणाले होते, परंतु 15 पैसेसुद्धा कोणाच्या खात्यात आले नाहीत. 

पवारांना उद्देशून मुंडे म्हणाले, पवार साहेब आपण या 4 वर्षांतील या सरकारचे अपयशाचे पुस्तक काढून ते आपण मजुरांकडे पोहोचवू. ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणाऱ्या सामान्य माणसाकडे जाऊ, ते कपिल देव यांच्याकडे गेले तर आपण बळी देवाकडे जाऊ. छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेत आलो, असे भाजपा म्हणते. राष्ट्रवादीचा 2019 चा स्थापना दिवस आपण परिवर्तन दिवस म्हणून साजरा करू, असा आशावादही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: It is said that 15 lakhs will come to everybody's account, 15 paise has not been received, Dhananjay Munde criticized Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.