‘ते ’ पेशवेकालीन भुयार नव्हे तर ब्रिटीशकालीन जलसारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 02:49 PM2019-04-26T14:49:04+5:302019-04-26T14:56:27+5:30

मेट्रोच्या मल्टिलेव्हल हबचे स्वारगेट येथे काम सुरु आहे. याठिकाणी दगडी बांधकाम असलेले भुयार सापडले

'It' is not underground tunnel by Peshwa, but a British watershed | ‘ते ’ पेशवेकालीन भुयार नव्हे तर ब्रिटीशकालीन जलसारणी

‘ते ’ पेशवेकालीन भुयार नव्हे तर ब्रिटीशकालीन जलसारणी

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र पुरातत्व खात्याकडून स्पष्टीकरणभविष्यात पुणेकरांच्या माहितीकरिता वेगळी जलसारणी तयार करणारपुरातत्व प्रशासनाला या बांधकामासंबंधी एक ब्रिटीशकालीन सापडला संदर्भ 1908 रोजी सुरु झालेले जलसारणीचे काम 1915 मध्ये पूर्ण

पुणे :  स्वारगेट मेट्रोचे काम सुरु असताना सापडलेले भुयार हे ब्रिटीशकालीन जलसारणी असून ते बांधकाम पेशवेकालीन नाही. असे  स्पष्टीकरण महाराष्ट्र पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.  तसेच भविष्यात त्याजागेवर भुयार होते याची आठवण पुणेकरांना राहावी याकरिता स्वतंत्र नवीन त्याच आकाराची, शैलीची जलसारणी मेट्रोकडून तयार करण्यात येणार आहे. अशाप्रकारच्या सुचना त्यांना पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 
 मेट्रोच्या मल्टिलेव्हल हबचे स्वारगेट येथे काम सुरु आहे. याठिकाणी दगडी बांधकाम असलेले भुयार सापडले. असे वृत्त सर्वप्रथम ‘ लोकमत ’ ने प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर मेट्रोच्या प्रशासकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना तोंड फुटले. भुयाराच्या वृत्ताची दखल पुरातत्व विभागाकडून घेण्यात आली. पुणे पुरातत्व विभागाकडून महाराष्ट्र पुरातत्व विभागाला अहवाल पाठविण्यात आला. यानंतर पुरातत्व विभाग व मेट्रोचे पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. त्यानुसार पुरातत्व विभागाने त्यांना विविध सुचना करुन योग्य ते बदल करण्यास सुचवले. याविषयी पुणे पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे  सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी सांगितले, स्वारगेट जवळील भुयारे ही हेरिटेजच्या व्याख्येत बसणारी नाहीत. तसेच हेरिटेजविषयक ज्या अटी आहेत त्या पूर्ण करणारी देखील नाहीत. महाराष्ट्र पुरातत्व प्रशासनाला भुयारासंबंधीचा अहवाल सादर करताना शहराचा इतिहास, खोदकाम करताना नेमक्या कशास्वरुपाची माहिती मिळाली ते नमुद करणे, बांधकामाविषयी नित्कर्ष नोंदविणे, आदी मुद्यांविषयीची माहिती देण्यात आली. पुरातत्व प्रशासनाला या बांधकामासंबंधी एक ब्रिटीशकालीन संदर्भ सापडला आहे. त्यात हे भुयार नसून ब्रिटीशकालीन जलसारणी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 
 साधारणपणे 1908 ते 1915 दरम्यान जलसारणीचे काम झाल्याचा उल्लेख ब्रिटीशकालीन कागदपत्रांमध्ये आढळुन आला आहे. ब्रिटीशांनी शहरात पाणीपुरवठा तयार करण्यासाठी त्याची निर्मिती केली होती. पेशव्यांनी कात्रजवरुन शहरात पाणी आणण्याकरिता देखील जलवाहिनीची निर्मिती केली होती. मात्र, ते बांधकाम ऐतिहासिक आणि अधिक वैशिष्टपूर्ण म्हणता येईल. मेट्रो प्रशासनाला ब्रिटीशकालीन जलसारणीच्या प्रतिकृती तयार करण्यास सांगितले असून त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरु झाली आहे. सध्या त्या जलसारणीतील दगडांवर मार्किंगचे काम सुरु असून ते येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार असल्याचे माहिती वहाणे यांनी लोकमतला दिली. 

*   1908 रोजी सुरु झालेले जलसारणीचे काम 1915 मध्ये पूर्ण झाले. मुठा नदीतून घेतलेले पाणी स्वारगेटच्या जलकेंद्रात आणले गेले. त्याकरिता कनॉलचा आधार घेण्यात आला. तत्कालीन परिस्थितीत शहराकरिता पाण्याचा पुरवठा आवश्यक असल्याने ब्रिटीशांनी स्थानिकांच्या मदतीने ही जलसारणीची निर्मिती केल्याचा संदर्भ पूना मेट्रोपोलिटन रिजनल प्लँनिंग्स बोर्डच्या 1970 ये 1991 च्या ग्रंथात आढळला आहे. 

* सुरुवातीला लोकमतने भुयार सापडल्याचे वृत्त प्रकाशित करताच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता पुरातत्व प्रशासनाकडून आलेल्या अहवालानंतर त्या वेगवेगळ्या पध्दतीच्या नित्कर्षांवर पडदा पडला आहे. येत्या काही दिवसांत जलसारणीच्या प्रतिकृतीचा आराखडा समोर येणार आहे. त्यात पुरातत्व विभागाने बदल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यापूर्वी वहाणे यांच्या पथकाने भुयाराची पाहणी केली असता ते बांधकाम प्राचीन अथवा ऐतिहासिक असल्याचे वाटत नाही. ते दगड, वीटा आणि सिमेंटचे काम असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. 

Web Title: 'It' is not underground tunnel by Peshwa, but a British watershed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.