महसुली तंटे मिटवण्याचा राज्यात नावीन्यपूर्ण प्रयोग' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:20 AM2018-12-22T00:20:50+5:302018-12-22T00:22:07+5:30

खेड तालुक्यातील पोलीस पाटलांनी गावाला अभिमान वाटावे, असे काम करावे. गावपातळीवरचे वादविवाद, तंटे गावातच मिटवावेत

 Innovative experiments in the state of dissolution of revenue | महसुली तंटे मिटवण्याचा राज्यात नावीन्यपूर्ण प्रयोग' 

महसुली तंटे मिटवण्याचा राज्यात नावीन्यपूर्ण प्रयोग' 

googlenewsNext

दावडी  - खेड तालुक्यातील पोलीस पाटलांनी गावाला अभिमान वाटावे, असे काम करावे. गावपातळीवरचे वादविवाद, तंटे गावातच मिटवावेत तसेच कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता नि:स्वार्थीपणे दोन्ही बाजूने वाटाघाटी करून पक्षपातीपणा न करता न्याय देण्याची भूमिका बजावावी, असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस पाटील बैठकीत बोलताना केले.
खेड पंचायत समितीत तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद पोलीस पाटलांना मार्गदर्शनपर बोलत होते. महसूल लोक अदालतीचे व न्यायालय न्यायालयातील प्रलंबित असणाऱ्या अर्धन्यायिक अपील प्रकरणांमध्येतडजोडीने वाद मिटवण्यासाठी पोलीस पाटलांनी काय काय प्रयत्न करायचे, याबाबत मार्गदर्शन करत आले.
आपल्या आपल्या गावातील प्रत्येक पोलीस पाटलांना गावातील महसुल दाव्याची यादी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे संबंधित पक्षकार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यामधील वाद सामोपचाराने वाटाघाटीने मिळवण्याच्या दृष्टिने पोलीस पाटलांनी प्रयत्न करावयाचा आहे. त्यासाठी त्यांना योग्य ते सूचनांचे पालन करून तंटे मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत, आयुष प्रसाद यांनी सांगितले.
कोणत्याही राजनैतिक गटाचा नसावा, गुंड व्यक्तीचा याकामी हस्तक्षेप होणार नाही यावरही पोलीस पाटलाने महत्त्वाची भूमिका पार पाडावी.
यावेळी गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब शिंदे, खेड तालुका पोलीस संघटना अध्यक्ष रवींद्र ठाकूर, उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे , खेड पोलीस पाटील महिला आघाडीच्या तृप्ती मांडेकर यांच्यासह विविध गावातील पोलीस पाटील उपस्थित होते.

काही प्रकरणात चर्चा वाटाघाटी अंती तडजोड घडून येत असेल अशा प्रकरणांमध्ये तडजोड करण्यासाठी सर्व पक्षकारांच्या स्वाक्षºया घेऊन ओळखपत्र संबंधित पक्षकार यांना महसूल लोक अदालतसाठी उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयात उपस्थित राहून तडजोड नामा सादर करावा.
खेड तालुक्यात महसुली दावे दोनशे एकोणीस आहे त्यापैकी शंभर तरी दावे निकाली निघाले पाहिजे, असा सल्ला आयुष प्रसाद यांनी पोलीस पाटलांना दिला.

महसुल लोक अदालतीमध्ये दोनशे एकोणीस महसुली दावे आहेत. त्यापैकी ५० दावे पोलीस पाटलांनी तडजोड करून मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. २५ डिसेंबरपर्यंत अजून गावातील महसुली तंटे त्या-त्या गावच्या पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यामार्फत मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-बाळासाहेब शिंदे,
राज्य पोलीस पाटील संघाचे सरचिटणीस

Web Title:  Innovative experiments in the state of dissolution of revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे