अपक्ष उमेदवारांना '' नोटा '' पेक्षा कमी मते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:46 AM2019-03-27T11:46:32+5:302019-03-27T11:51:03+5:30

बहुतांश विधानसभा मतदार संघात अनेक अपक्ष उमेदवारांना नोटाची आकडेवारी सुध्दा गाठता आली नाही.

Independent candidates have less votes than "nota" | अपक्ष उमेदवारांना '' नोटा '' पेक्षा कमी मते

अपक्ष उमेदवारांना '' नोटा '' पेक्षा कमी मते

Next
ठळक मुद्देनोटाचा वापर करणाऱ्या मतदारांचे मन वळवण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार विविध स्वयंसेवी संस्थांकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती मागील लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात तब्बल ४१ हजाराहून अधिक नोटाचा अवलंब

पुणे : पसंतीचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात नसल्यास मतदारांना नन ऑफ द अबो (नोटा) वापरण्याचा अधिकार मतदारांना देण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील तब्बल ४१ हजाराहून अधिक मतदारांनी नोटाचा अवलंब केला होता. बहुतांश विधानसभा मतदार संघात अनेक अपक्ष उमेदवारांना नोटाची आकडेवारी सुध्दा गाठता आली नाही. त्यामुळे नोटाचा वापर करणाऱ्या मतदारांचे मन वळवण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे. 
लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून राजकीय पक्षांकडून लोकसभेचे आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्येक मतदाराच्या लोकप्रतिनिधींकडून काही अपेक्षा असतात. त्याचप्रमाणे काही मतदार उमेदवाराला नाही तर राजकीय पक्षाला मतदान करत असतात. काही पक्षांचा पारंपरिक मतदार असतो. त्यामुळे एखाद्या मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार उभा नाही,असे निदर्शनास आल्यास मतदारांकडून नोटाचा वापर होतो. त्यातच गेल्या काही कालावधीपासून वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेले उमेदवार निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यातील किती उमेदवार नोटा देणाऱ्या मतदारांचे मन वळविण्यात यशस्वी होणार हे येत्या २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानांतर २३ मे रोजी केल्या जाणाऱ्या मतमोजणीवरून समोर येईल.
विविध स्वयंसेवी संस्थांकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती केली जात आहे.शासनाकडूनही मतदार जागृतीसाठी विविध उपाय योजना केली जात आहे.प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना व्यतिरिक्त अपक्ष लोकसभा निवडणूक लढणारे काही उमेदवार आहेत.मात्र,त्यांना नोटाच्या मतदानाचा आकडाही गाठता आला नाही.२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत अरूण भाडिया यांनी अपक्ष निवडणूक लढवली. वडगावशेरी मतदार संघातून त्यांना केवळ १४४९ मते मिळाली तर नोटाची मते ११९८ होती.
पुणे लोकसभा मतदार संघातील नोटा मतदारांची आकडेवारी (मतदारसंघ निहाय)
मतदारसंघाचे नाव          मतदारांची संख्या 
वडगावशेरी                         ११९८
शिवाजींनगर                      १०४८
कोथरूड                            ११२९
पर्वती                                १०१६
पुणे कॅन्टोन्मेंट                  ९५१
कसबा                             ११०१
---
एकूण                             ५३१४
----
बारामती लोकसभा मतदार संघातील नोटा मतदारांची आकडेवारी 
मतदारसंघाचे नाव     मतदारांची संख्या 
दौंड                                ६०
इंदापूर                         १३४७
बारामती                      १९५२
पुरंदर                          १५३०
भोर                             २०३७
खडकवासला              ६२३३
-
एकूण                       १३,१५९
--
शिरूर लोकसभा मतदार संघातील नोटा मतदारांची आकडेवारी 
मतदारसंघाचे नाव     मतदारांची संख्या 
जुन्नर                २१८८
आंबेगाव          १७९७
खेड-आळंदी     १७४३
शिरूर               १५८९
भोसरी             १७८६
हडपसर         २८८५
--
एकूण            ११,९८८
---
मावळ लोकसभा मतदार संघातील नोटा मतदारांची आकडेवारी 
मतदारसंघाचे नाव     मतदारांची संख्या 
पनवेल                                 २७१२
कर्जत                                   १२२१
उरण                                  १७८४
मावळ                                १५१६
चिंचवड                             २०९१
पिंपरी                                 १८५४
----
एकूण         ११,१७८ 
---

Web Title: Independent candidates have less votes than "nota"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.