बेकायदा मांस वाहतूक; वाहने जप्त

By admin | Published: July 6, 2015 04:24 AM2015-07-06T04:24:57+5:302015-07-06T04:24:57+5:30

तब्बल सव्वादोन लाख रुपये किमतीचे अंदाजे दोन हजार किलो गाय, म्हैस व रेड्याच्या रक्तमिश्रित मटणाची वाहतूक करणाऱ्या तीन महिंद्र पिक-अप गाड्या लोणी काळभोर पोलिसांनी कवडीपाट टोलनाक्यावर पकडल्या.

Illegal meat transport; Vehicles seized | बेकायदा मांस वाहतूक; वाहने जप्त

बेकायदा मांस वाहतूक; वाहने जप्त

Next

लोणी काळभोर : तब्बल सव्वादोन लाख रुपये किमतीचे अंदाजे दोन हजार किलो गाय, म्हैस व रेड्याच्या रक्तमिश्रित मटणाची वाहतूक करणाऱ्या तीन महिंद्र पिक-अप गाड्या लोणी काळभोर पोलिसांनी कवडीपाट टोलनाक्यावर पकडल्या असून, तीन जणांना अटक केली.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी याकूब सुभाष केदार (वय २०, रा. भीमनगर, दौंड, ता. दौंड, जि. पुणे), इम्रान इब्राहिम कुरेशी (वय २३, रा. खाटीक गल्ली, दौंड, ता. दौंड, जि. पुणे), मोहब्बत भाईलाल कुरेशी ( वय ३३, महात्मा फुले वसाहत, सातववाडी, गाडीतळ, हडपसर, पुणे) या तिघांना जागेवरच अटक केली आहे, तर त्यांचा साथीदार हसन हुसेन शेख (रा. इंदापूर, जि. पुणे) हा मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. या संदर्भात पोलीस कर्मचारी लोकेश रमेश राऊत यांनी फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुरक्षा सुधारणा अधिनियम १९९५ कायदा कलम ९ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. डी. बडवे करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Illegal meat transport; Vehicles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.