हजेरी नसेल तर विद्यार्थ्याला परीक्षेस मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:29 AM2017-12-05T07:29:50+5:302017-12-05T07:30:07+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ७५ टक्के हजेरी न भरणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी विभागातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना दहा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.

If the absence of attendance, the student will not be allowed to appear | हजेरी नसेल तर विद्यार्थ्याला परीक्षेस मनाई

हजेरी नसेल तर विद्यार्थ्याला परीक्षेस मनाई

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ७५ टक्के हजेरी न भरणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी विभागातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना दहा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ७५ टक्के हजेरीचा नियम लावण्यास सुरुवात करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तूर्तास मराठी विभागाकडूनच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र इतर विभागांनीही यानुसार कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.
मराठीच्या १० विद्यार्थ्यांनी एका विषयाची परीक्षा दिल्यानंतर अचानक त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजीची भावना निर्माण झाली आहे. मराठी विभागामध्ये तिसºया सत्रात शिकणाºया विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती भरली नाही. त्यामुळे त्यांना पेपर देण्यास मनाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु समितीने परीक्षा सुरू होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय देणे आवश्यक असताना एक पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढचे पेपर देण्यास मनाई केली आहे.
समितीचा निर्णय उशिरा आल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.

Web Title: If the absence of attendance, the student will not be allowed to appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.