निरा नरसिंहपूर येथील संगमावर कावळ्यांची होतेय उपासमार; लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक विधी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:10 PM2020-04-16T17:10:07+5:302020-04-16T18:06:15+5:30

श्री लक्ष्मी नरसिंहाच्या निरा भीमा संगमावर दररोज दशक्रिया विधी नागबळी त्रिपिंडी कालसर्प अशा अनेक पूजा होतात,परंतु लॉकडाउन असल्यामुळे सर्व धार्मिक विधी बंद

THE hunger strike of crow At the confluence at NIra Narsinghpur river sangam | निरा नरसिंहपूर येथील संगमावर कावळ्यांची होतेय उपासमार; लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक विधी बंद

निरा नरसिंहपूर येथील संगमावर कावळ्यांची होतेय उपासमार; लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक विधी बंद

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका नीरा,भीमा नदीच्या संगमावर पक्षांनाही फटका

बाळासाहेब सुतार- 
निरा नरसिंहपूर : इंदापुर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर प्राचीन देवस्थान आहे.त्याचबरोबर हे देवस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकुटुंबाचे कुलदैवत  आहे. कोरोना व्हायरस चा फटका येथील निरा व भिमानद्यांच्या संगमावरील कावळ्याला तसेच इतरही पक्षांवर उपासमारीची वेळ आलीआहे.
       श्री लक्ष्मी नरसिंहाच्या निरा भीमा संगमावर दररोज दशक्रिया विधी नागबळी त्रिपिंडी कालसर्प अशा अनेक पूजा होतात.परंतु, लॉकडाउन असल्यामुळे सर्व धार्मिक विधी बंद करण्यात आले आहे. दशक्रिया विधीमध्ये काकस्पर्शला अनन्य साधारण महत्व आहे. संगमावर होणाऱ्या विविध धार्मिक विधींवर कोरोनामुळे संक्रात आल्याने तिथून पक्षांसाठी मिळणारा रोजचा घास बंद झाला आहे. त्यात सर्वाधिक कावळ्यांची उपासमार होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारकडून २१दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर अनेक मजूर रस्त्यावर आले. त्यासोबत गरिबांचेही जेवणाचे हाल होत आहेत. या लॉकडाऊनचा फटका आता नीरा व भीमा नदीच्या संगमावर पक्षांनाही बसत असल्याचे समोर आलेआहे.संगमावर कावळे पोटासाठी अन्न खाण्यास मिळत नाही म्हणून नरसिंहाच्या मंदिरावर वर व गावातील घराभोवती गोळा होऊन किलबिल करत असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे.   
संगमाच्या ठिकाणी मोठी झाडे वृक्ष असल्याने अनेक प्रकारची पक्षी, कावळे चिमण्यांचा किलबिलाट असतो. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून घरातुन बाहेर पडू नये, म्हणून शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणे धोक्याचे होत आहे. या ठिकाणी कोणतीही वर्दळ नाही. कावळ्यांना पोटासाठी खाण्यास मिळत नाही. म्हणून कावळे आरडा ओरडा करायला लागले आहेत.
निरा नरसिंहपुर येथील पक्षी मित्रांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पक्षांना खाद्यवस्तू तांदूळ, बिस्किटे, भात इतर खाद्य पदार्थ उपलब्ध केले आहेत. लॉकडाऊनमध्ये तर आता आणखी  वाढ करण्यात आली आहे. हा  आता ३0 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे या लॉकडाऊनचा फटका पक्षांना बसू शकतो. यावर पशुसंवर्धन विभाग काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------

Web Title: THE hunger strike of crow At the confluence at NIra Narsinghpur river sangam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.