एसीत बसून दुष्काळाची दाहकता काय कळणार?- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 01:58 AM2018-12-07T01:58:27+5:302018-12-07T01:58:36+5:30

मंत्रालयामध्ये एसीत बसणाऱ्या या अधिका-यांना काय दुष्काळ कळणार?

how understand the responsibility of drought to the officers ? - Ajit Pawar | एसीत बसून दुष्काळाची दाहकता काय कळणार?- अजित पवार

एसीत बसून दुष्काळाची दाहकता काय कळणार?- अजित पवार

Next

पुणे : दुष्काळाची पाहणी करण्याकरिता जिल्ह्यात पथक आले आहे; मात्र मंत्रालयामध्ये एसीत बसणाऱ्या या अधिका-यांना काय दुष्काळ कळणार? शेतक-यांनी पथकाकडे आपल्या समस्या मांडल्यावर अधिकारी म्हणतात, ‘तुम्ही पेरण्या करा’ मात्र पाणीच नसल्याने साधे गवतही उगवत नाही अशा ठिकाणी पेरण्या करण्याचे सल्ले दिले जात आहे, अशी टीका केंद्र सरकारच्या दुष्काळपाहणी समितीवर अजित पवार यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कृषिभूषण डॉ़ अप्पासाहेब पवार पुरस्कार, कृषिनिष्ठ शरद आदर्श कृषिग्राम व आदर्श गोपालक पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते अल्पबचत भवन येथे करण्यात आले. या वेळी ते बोलत होते़ याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषिसभापती सुजाता पवार, प्रवीण माने, राणी शेळके, सुरेखा चौरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एऩ पी़ मित्रगोत्री आदी उपस्थित होते़
पवार म्हणाले की, सध्या राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकार पाहणी करीत आहेत. या अधिकाºयांसमोर शेतकरी त्यांच्या समस्या मांडत आहेत.
मात्र, या समितीकडून त्यांना चुकीचे सल्ले दिले जात आहेत. ज्या ठिकाणी पाणीच नाही त्या ठिकाणी पेरणी करा, असे शेतकºयांना सांगितले जात आहेत. जे अधिकारी मंत्रालयात एसीमध्ये बसत असतील त्यांना शेतकºयांना दुष्काळाची बसत असलेली धग काय कळणार ? या सरकारच्या काळात नीरव मोदी, विजय माल्यासारख्या बड्या उद्योगपतींना सवलत दिली जाते; मात्र शेतकºयांची कर्जमाफी ही फ क्त नावापुरती केली जाते, सदाभाऊ खोत यांनी केंद्राकडे कांद्यासाठी अनुदान मागणार असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, शेतकºयांच्या अडचणी वाढल्यावर राज्यात दुष्काळाची भीषण पार्श्वभूमी असताना सरकारतर्फे निर्णय घेतले जात नाहीत.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर पवार म्हणाले की, पदाधिकाºयांनी सामान्य माणसांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाभर दौरे करा,़ टँकरसाठी पाठपुरावा करा.
या वेळी सुजाता पवार यांनी प्रास्ताविक केले, तर आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले़ आभार डॉ़. एस़ बी़ विधाटे यांनी मानले़
जिल्हा परिषदेतर्फे राजशिष्टाचाराचा भंग
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकरी व गोपालक पुरस्कार सोहळा संपन्न झाला; मात्र या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्र्यांचे नाव न घातल्याने राजशिष्टाचाराचे पालन झाले नाही. त्यांना या कार्यक्रमांचे निमंत्रणही देण्यात आले नाही, असा आरोप भाजपा गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी केला. ही बाब गांभीर्याने घेण्यात यावी तसेच याप्रकरणी दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याकडे केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांचे जिल्हा परिषदेला सर्वोतपरी सहकार्य असते. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेच्या विभागांना निधी देताना त्यांनी कधीही अन्याय केलेला नाही. मुळात पुरस्कार कोणाच्या हस्ते द्यायचा याचे स्वातंत्र्य आयोजकाला असले, तरी नियमावलीप्रमाणे निमंत्रण पत्रिका पाहणे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
जिल्ह्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येक कार्यक्रमात शासनाने आखून दिलेल्या नियमावलीप्रमाणे लोकप्रतिनिधींचे नावे कार्यक्रम पत्रिकेमध्ये देणे गरजेचे असते; परंतू जिल्हा परिषदेकडून ही नियमावली पाळली जात नाही. यामुळे जे पदाधिकारी आणि अधिकारी ही नियमावली पाळत नाही. त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात
म्हटले आहे.

Web Title: how understand the responsibility of drought to the officers ? - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.