इतिहास शनिवार वाड्याचा, कोड स्कॅन करा; डिजीटल गाईड घेऊन जा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 07:01 AM2023-11-20T07:01:45+5:302023-11-20T07:02:10+5:30

ऑडिओ गाइड करणार मराठीत मार्गदर्शन

History of Shaniwar Wada, scan the code; Go with the digital guide! | इतिहास शनिवार वाड्याचा, कोड स्कॅन करा; डिजीटल गाईड घेऊन जा!

इतिहास शनिवार वाड्याचा, कोड स्कॅन करा; डिजीटल गाईड घेऊन जा!

लोकमत न्यूज नेटवर्क   
पुणे : शनिवारवाड्याचा इतिहास आता पर्यटकांना डिजिटल ऑडिओ गाइडच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यासाठी महापालिकेकडून वाडा परिसरात ‘क्यूआर कोड’ बसविण्यात येणार आहे. त्यात मोबाइलमध्येच हे संभाषण डाऊनलोड करून पर्यटकांना ऐकता येणार आहे.  

‘गुंज इंडिया’ या संस्थेकडून ही सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून  देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने  स्थायी समितीपुढे ठेवला आहे. इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. त्यांना या सेवेचा लाभ होईल.  

निव्वळ उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम महापालिकेस
nमहापालिकेकडून हेरिटेज वॉकच्या माध्यमातून तसेच लाइट ॲण्ड साऊंड शोच्या माध्यमातून पर्यटकांना माहिती दिली जात असली तरी या दोन्ही उपक्रमांना वेळेची मर्यादा आहे. याच कारणातून पर्यटकांना डिजिटल ऑडिओ गाइड उपलब्ध करून दिला जाणार आहे.  
nया ऑडिओ गाइडद्वारे मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम महापालिकेस दिली जाणार असून, ५० टक्के रक्कम मे. गुंज इंडिया घेणार आहे. 

विदेशी पर्यटकांनाही  सुविधेचा फायदा 
शनिवारवाड्याबाहेरील परिसरात स्टीलचे क्यूआर कोड फलक व प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोड फलक बसवून पर्यटकांना ते ‘ऑनलाइन’ घेण्याची व्यवस्था असेल.  
ध्वनी संभाषणासह मोबाइलवर मिळणाऱ्या माहितीसाठी भाषेनुसार शुल्क आकारण्यात येईल. मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती मिळेल. विदेशी पर्यटकांना मागणीनुसार जर्मनी, जपानी अशा भाषांमध्येही देण्यात येणार आहे. 

भाषेनुसार माहितीचे दर­­­
मराठी ५० रु.
हिंदी ७५ रु.
इंग्रजी १०० रु.

Web Title: History of Shaniwar Wada, scan the code; Go with the digital guide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.