हिंजवडी वाहतूक विभाग १६६ डीडी केसेस करीत पुण्यात अव्वल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 07:25 PM2018-01-01T19:25:01+5:302018-01-01T19:25:15+5:30

आयटी नगरी हिंजवडी परिसरात सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सरसावलेल्या तरुणाईच्या अती धांगडधिंगाण्याला वाहतूक पोलिसांनीचाफ लावत केवळ ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल १६६ डीडी केसेस

Hinjewadi Transport Department has 166 DD cases registered in Pune | हिंजवडी वाहतूक विभाग १६६ डीडी केसेस करीत पुण्यात अव्वल 

हिंजवडी वाहतूक विभाग १६६ डीडी केसेस करीत पुण्यात अव्वल 

Next

पिंपरी-चिंचवड (वाकड) : आयटी नगरी हिंजवडी परिसरात सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सरसावलेल्या तरुणाईच्या अती धांगडधिंगाण्याला वाहतूक पोलिसांनीचाफ लावत केवळ ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल १६६ डीडी केसेस (मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई) करीत पुणे शहर वाहतूक पोलीसात अव्वलस्थान पटकाविले आहे. त्यांच्या खालोखाल विश्रांतवाडी १०३ वदत्तवाडी पोलिसांनी १०१ कारवाई केल्या.  

गतवर्षी हिंजवडीत डीडीच्या केवळ ६६ कारवाया होत्या मात्र वरिष्ठांच्या जास्तीत जास्त डी. डी कारवाया करण्याबाबत आदेश होते त्यातच नाताळच्या सुट्ट्या,विकेंडला गाठून आलेले नववर्ष या सर्वामुळे ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी सोनेपे सुहागा असल्याने बहुतेक सर्वांनीच तगडे नियोजन आखले होते आयटी पंढरी समजल्या जाणाऱ्या हिंजवडीत अनेक हॉटेल्स सज्ज झाले होते प्रत्येत हॉटेलमध्ये पासद्वारे अनलिमिटेड मद्य आणि जेवण याबरोबर मनोरंजनाच्या कार्यक्रमांची खास सोय अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. हिंजवडी परिसरात सजलेले एकसे बढकर एक हॉटेल तसेच हिंजवडी हद्दीत बावधन येथे सुरु असलेल्या सनबर्न फेस्टिवलमुळे अवघी तरुणाई या भागात अवतरल्याचे चित्र होते त्यामुळे वाहतूक पोलिसांनी देखील यंदा रात्रभर पहारा देत कसलीही हयगय न करता तब्बल १६६ कारवाया करीत बेभान तरुणाईला रोखले.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुणे शहरात नो ट्राफिक व्हायलेशन झोन तयार करण्यात आले होते या झोन मध्ये जास्तीत जास्त कारवाई आणि केसेस करण्याचा आदेश होता या दीड किमी अंतराच्या झोन मध्ये देखील हिंजवडी वाहतूक विभागाने ६ ते ३१ डिसेंबर या २५ दिवसात १७५७ कारवाई करीत ५ लाख २५ हजार नऊशे रुपये दंड जमा करत यात देखील प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याचबरोबर १ जानेवारी ते ३० डिसेंबर या वर्षभरात विनाहेल्मेट ३ हजार तीनशे ६८ कारवाया केल्या यात जमा झालेली दंडाची रक्कम तब्बल पुणे शहरातील चार झोन मिळून जमा झालेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम केवळ हिंजवडी विभागाची आहे. त्याचबरोबवर वर्षभर ३०९ अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली या कारवाईत कोरड सुमारे ५ हजार रुपये दंड घेते. डीडी कारवाई झाल्यानंतर मेमो देत पोलीस वाहन परवाना, आधार कार्ड, किंवा पॅन कार्ड यापैकी एकतरी ओळखपत्र जमा करणे बंधनकारक आहे त्यामुळे कारवाई झालेल्या वाहनचालकाला कोर्टात जाऊन दंड भरल्याशिवाय गत्यंतर नाही. 

Web Title: Hinjewadi Transport Department has 166 DD cases registered in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस