अहो आश्चर्य! उन्हापासून संरक्षण म्हणून ‘त्याने’ चक्क टोपीलाच बसविला ‘सोलर फॅन ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 05:16 PM2018-04-19T17:16:19+5:302018-04-19T17:16:19+5:30

आचारी असलेल्या व सतत बाहेर कामाची धावपळ असणाऱ्या सांगवीतील तरुणाने एक अफलातून शक्कल लढवत स्वत:च्या टोपीलाच सोलर फॅन बसवला

Hey surprise! 'He' as a protection from sun protection, 'solar fan' | अहो आश्चर्य! उन्हापासून संरक्षण म्हणून ‘त्याने’ चक्क टोपीलाच बसविला ‘सोलर फॅन ’ 

अहो आश्चर्य! उन्हापासून संरक्षण म्हणून ‘त्याने’ चक्क टोपीलाच बसविला ‘सोलर फॅन ’ 

googlenewsNext
ठळक मुद्दे तीव्र ऊन आणि गरम हवेपासून संरक्षण यासाठी नवीन शक्कल लढवलीगाडीवरच्या प्रवासादरम्यान तसेच इतर ठिकाणी या फॅनमुळे कुठलाही त्रास नाही.

सांगवी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. तीव्र उन्हाच्या झळांमुळे नागरिक पुरते हैराण आहेत. एका ठिकाणी बसून व्यवसाय व नोकरी करणे शक्य नाही, या लोकांना उन्हाच्या झळा सोसत बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. अशाच आचारी असलेल्या व सतत बाहेर कामाची धावपळ असणाऱ्या सांगवीतील तरुणाने एक अफलातून शक्कल लढवत स्वत:च्या टोपीलाच सोलर फॅन बसवला. त्या भन्नाट अवलियाचे नाव आहे कैलास घोरपडे... 
  दुपारी घराबाहेर न पडता घरी कामाच्या ठिकाणी कूलर, फॅन, एसी आदी उपकरणे लावून तीव्र उन्हापासून नागरिक संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ताक, लस्सी, सरबत आदी थंड पदार्थांचे सेवन वाढले आहे. 
उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण आहेत. घोरपडे यांनी तीव्र ऊन आणि गरम हवेपासून संरक्षण यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. डोक्यावर टोपीमध्ये सोलर फॅन बसवला असून पर्यावरणपूरक व आरोग्यासाठी हितकारक असा पंखा आपल्या डोक्यावर बसवून ते सांगवीत चर्चेचा विषय ठरत आहे. टोपीच्या वरील भागावर ३ बाय ३ इंच आकाराच्या सोलर प्लेटच्या साह्याने जोडलेल्या टोपीच्या पुढे अगदी कपाळावरील ठिकाणी या फॅनच्या फिरण्याने अजिबात गरम हवा व घाम येत नाही.गाडीवरच्या प्रवासादरम्यान तसेच इतर ठिकाणी या फॅनमुळे कुठलाही त्रास होत नाही. सौर ऊर्जेचा उपयोग होत असल्याने ते पर्यावरणपूरकही असून, हा फॅन एका मित्राने मुंबईतून भेट दिल्याचे घोरपडे अभिमानाने सांगतात.

Web Title: Hey surprise! 'He' as a protection from sun protection, 'solar fan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.