तीन महाविद्यालयांना हेरिटेज दर्जा

By admin | Published: July 6, 2015 03:28 AM2015-07-06T03:28:09+5:302015-07-06T03:28:09+5:30

विद्यापीठ अनुदान आयोगातर्र्फे (यूजीसी) जाहीर करण्यात आलेल्या १९ हेरिटेज महाविद्यालयांच्या यादीत राज्यातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

Heritage status to three colleges | तीन महाविद्यालयांना हेरिटेज दर्जा

तीन महाविद्यालयांना हेरिटेज दर्जा

Next

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगातर्र्फे (यूजीसी) जाहीर करण्यात आलेल्या १९ हेरिटेज महाविद्यालयांच्या यादीत राज्यातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यात मुंबईतील सेंट झेवियर्स, पुण्यातील फर्ग्युसन आणि नागपूरच्या हिसलॉप महाविद्यालयांचा समावेश आहे.
यूजीसीने १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या देशभरातील महाविद्यालयांना हेरिटेज दर्जा देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हेरिटेजचा दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना यूजीसीकडून महाविद्यालयाच्या संवर्धनासाठी विशेष अनुदान देण्यात येणार आहे. त्यात मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाला १.५३ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. तर पुण्याच्या फॉर्ग्युसन आणि नागपूरच्या हिसलॉप महाविद्यालयाला प्रत्येकी २० लाखांचे अनुदान यूजीसीने जाहीर केले आहे.
हेरिटेज दर्जा देण्यासाठी यूजीसीने देशभरातील महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार देशभरातील ६० महाविद्यालयांनी
अर्ज केले होते. यूजीसीने जाहीर केलेल्या या यादीत गुवाहटी
येथील कॉटन महाविद्यालयाला सर्वाधिक ४.३५ कोटींचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यूजीसीकडे आणखी १६० महाविद्यालयांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, या प्रस्तावांची तपासणी करण्यात येणार असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Heritage status to three colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.