चाकणला अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Published: May 28, 2016 04:16 AM2016-05-28T04:16:00+5:302016-05-28T04:16:00+5:30

येथील माणिकचौक, शिक्रापूरचौक आणि जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरील; तसेच एसटी बसस्थानकाबाहेरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात

Hammer on encroachment on Chakla | चाकणला अतिक्रमणांवर हातोडा

चाकणला अतिक्रमणांवर हातोडा

Next

चाकण : येथील माणिकचौक, शिक्रापूरचौक आणि जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावरील; तसेच एसटी बसस्थानकाबाहेरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
यात अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांचा समावेश असून, राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग, नगरपरिषद यांनी संयुक्त कारवाई केली. त्यामुळे येथील चौकांनी मोकळा श्वास घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून येथील अतिक्रमणांमुळे मोठी वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे नागरिकांसह प्रवासी मेटाकुटीला आले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण केलेल्या टपरी धारकांना दिनांक ९/०५/२०१६ व १३/०५/२०१६ रोजी पूर्व सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी अतिक्रमणे काढली नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील माणिक चौकतील दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा मारला .
आज (दि.२७) सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता एस. पी. हबू, सहायक अभियंता पूजा काळे, चाकण नगर परिषदचे आरोग्य विभागाचे विजय भोंडवे, महसूल विभागाचे मंडल अधिकारी आर. एस. मोराळे, तलाठी एम. एम.चोरमले, बांधकाम विभागाचे पदाधिकारी, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहायक पोलीस निरीक्षक संजय ढवाण, उपनिरीक्षक महेश मुंढे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

अतिक्रमणांची कारवाई करण्यापूर्वी पूर्वसूचना न देता प्रशासनाने अचानक कारवाई केल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यात मोठी नाराजी होती. मात्र, या कारवाईपूर्वी पंधरा दिवसांत दोन वेळा रीतसर नोटीस बजावूनही अतिक्रमणधारकांचे दुर्लक्ष केल्यामुळे आजची कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Hammer on encroachment on Chakla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.