पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजरोहण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 14:47 IST2017-08-15T14:45:15+5:302017-08-15T14:47:08+5:30
पुणे शहरात पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मंगळवारी विधान भवनाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन करण्यात आले.

पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजरोहण
पुणे, दि. 15 - पुणे शहरात पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते मंगळवारी विधान भवनाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन करण्यात आले. विधान भवन परिसरात सकाळी 9.05 वाजता ध्वजवंदनाचा शानदार समारंभ पार पडला. पालकमंत्री गिरीश बापट यांचे सकाळी विधान भवनात दाखल झाल्यानंतर विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदनानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, आमदार भिमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार शरद रणपिसे, आमदार जयदेव गायकवाड, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव,अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.