बारामतीत करदात्यांना मिळाला दिलासा

By admin | Published: February 28, 2016 03:42 AM2016-02-28T03:42:50+5:302016-02-28T03:42:50+5:30

बारामती नगर परिषदेच्या २६३ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेल्या या अंदाजपत्रकात शहरातील महत्त्वपूर्ण कामांसाठी निधीची तरतूद

Giving relief to taxpayers in Baramati | बारामतीत करदात्यांना मिळाला दिलासा

बारामतीत करदात्यांना मिळाला दिलासा

Next

बारामती : बारामती नगर परिषदेच्या २६३ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेल्या या अंदाजपत्रकात शहरातील महत्त्वपूर्ण कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. २६३ कोटी रुपये खर्चाच्या व ५० लाख रुपये शिलकीच्या या अंदाजपत्रकाला या वेळी मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. सभेची सुरुवात झाल्यानंतर नगरसेवक किरण गुजर यांनी गटनेत्या भारती मुथा यांनी अंदाजपत्रकाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अंदाजपत्रक सर्वसामान्यांवर कराचा बोजा न टाकणारे असावे, अशी भूमिका मुथा यांनी मांडली. अवैध बांधकामांना दुप्पट दंड आकारणी करण्याच्या विषयावर अवैध बांधकामांबाबत प्रशासनाने लक्षच दिले नसल्याचा आरोप नगरसेवक श्याम इंगळे यांनी केला. अशा बांधकामांना पाच पट दंड आकारावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली. यावर आगामी काळात अवैध बांधकामे होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी केली. नगरसेवक गुजर यांनी सध्याची करवसुली केवळ ३५ टक्के असल्याचे सांगून वसुलीबाबत नाराजी व्यक्त केली. विशेष सभेत नगराध्यक्ष जगताप यांनी यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याचे जाहीर केले. या वेळी विक्रांत तांबे, पौर्णिमा तावरे, सुषमा हिंगणे, प्रतिभा खरात, राहुल वाघोलीकर आदींनी अंदाजपत्रकावरील चर्चेत सहभाग घेतला. या वेळी उपनगराध्यक्ष ज्योती बल्लाळ, राहुल वाघोलीकर, नितीन बागल, सुनील सस्ते, शैलेश बगाडे, प्रशांत भोईटे, प्रतिभा खरात, सविता लोंढे, रेशमा शिंदे, आरती शेंडगे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख उपस्थित होते. खर्चात वाढीची मागणी 1हे अंदाजपत्रक शहराच्या विकासाला गती देणारे आहे. कोणतीही छुपी वाढ नसलेल्या या अंदाजपत्रकामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक अ‍ॅड. सुभाष ढोले यांनी व्यक्त केली. नगरसेवक सुनील सस्ते यांनी अंपग कामगारांच्या खर्चात भरीव वाढ करण्याची मागणी केली. 2शहरातील सध्याच्या पाणी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जुन्या विहिरींचा गाळ काढून त्या अधिग्रहित कराव्यात. शहरातील मोकळ्या मैदानावर व्यायाम सहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यावर नगराध्यक्ष जगताप यांनी विहीर दुरुस्ती व व्यायाम सहित्याबाबत तसेच शववाहिकेबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Giving relief to taxpayers in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.