शनिवार वाडा राजकीय सभांसाठी भाड्याने द्या : महापौरांकडे काँग्रेसची लेखी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 11:39 AM2018-12-08T11:39:24+5:302018-12-08T11:45:40+5:30

शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषदेत गुजरातचे आमदार वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

give a shaniwar Wada on rent for Political Meeting : Congress's written demand to mayors | शनिवार वाडा राजकीय सभांसाठी भाड्याने द्या : महापौरांकडे काँग्रेसची लेखी मागणी

शनिवार वाडा राजकीय सभांसाठी भाड्याने द्या : महापौरांकडे काँग्रेसची लेखी मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमान्य टिळकांपासून ते काकासाहेब गाडगीळ, यशवंतराव चव्हाण अशा अनेक नेत्यांच्या सभा एखाद्या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कोणत्याही कार्यक्रमांसाठी पोलिस परवानगी व एनओसी घेणे बंधनकारककार्यक्रमामुळे मोठी वाहतूक कोंडी

पुणे: पुण्यातील शनिवार वाडा पटांगणात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सभा होत आल्या आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार व सध्याचे मुख्यमंत्री अशा अनेक नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. परंतु, आता शनिवार वाड्यावर कोणत्याही राजकीय कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे सचिव संजय बालगुडे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवार वाडा राजकीय सभासाठी भाड्याने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. 
पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जुन शनिवारवाड्याला भेट देतात. शनिवार वाड्यामुळे पुण्याच्या पर्यटनाला देखील वेगळी ओळख मिळाली आहे. याच शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दी निमित्त एल्गार परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी  आणि जेएनयू छात्र संघटनेचा उमर खलिद यांच्या वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगावभीमाची दंगल घडल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवार वाड्यावर सर्व खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शनिवार वाड्या लगतच संवेदनशील परिसर असून, शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या भागात एखाद्या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कार्यक्रमामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी देखील होत असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने महापालिकेला कळविण्यात आले आहे. तसेच राज्याच्या विविध भागातून शनिवार वाडा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली देखील येतात. कार्यक्रमांमुळे बाहेरून येणा-या पर्यटकांना त्याचा आनंद घेता येत नाही. यामुळेच महापालिकेच्या वतीने यापुढे शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
याबाबात बालगुडे यांनी सांगितले की, शनिवार वाडा राजकीय सभांसाठी उपलब्ध करुन देऊ नये असे आदेश महापालिकेने काढले आहेत. तसेच अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी पोलिस परवानगी व एनओसी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेने जागा भाड्याने दिल्यावर पोलिसाची परवानगी घेणे गरजेचे नाही. तसेच शनिवार वाड्यावर सभा ही पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग आहे. त्यामुळे आपण त्वरीत आदेश देऊन शनिवार वाडा राजकीय सभा, कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी लेखी मागणी बालगुडे यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे.

Web Title: give a shaniwar Wada on rent for Political Meeting : Congress's written demand to mayors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.