'शक्ति मिशन''वरील ट्विटमुळे गिरीश बापट झाले ट्रोल : वाचा त्यांचे ''ते ''ट्विट !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 07:25 PM2019-03-28T19:25:54+5:302019-03-28T19:43:55+5:30

पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट चांगलेच ट्रोल झाले असून त्यांचे हे ज्ञान बघून भाजपच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला हात लावला आहे. 

Girish Bapat tweet on Shakti Mission is viral on social media | 'शक्ति मिशन''वरील ट्विटमुळे गिरीश बापट झाले ट्रोल : वाचा त्यांचे ''ते ''ट्विट !

'शक्ति मिशन''वरील ट्विटमुळे गिरीश बापट झाले ट्रोल : वाचा त्यांचे ''ते ''ट्विट !

Next

पुणे : पृथ्वीपासून नजीकच्या कक्षेत भ्रमण करणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करणाऱ्या भारताच्या मोहिमेचे देशभर कौतुक होत आहे. याच विषयावर पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट चांगलेच ट्रोल झाले असून त्यांचे हे ज्ञान बघून भाजपच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला हात लावला आहे. 

२०१४साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने प्रत्येक लोकप्रतिनिधीला सोशल मीडियावर सजग राहण्याचे आदेश दिले आहेत. घडलेल्या प्रत्येक घटनेचे आणि कामाचे अपडेट आमदारांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वच जण ट्विटर आणि फेसबुकवर देत असतात. भारताने बुधवारी यशस्वी केलेल्या शक्ती मिशनबाबत प्रतिक्रिया देताना बापट यांनी ''भारतावर टेहळणी करणारा'' उपग्रह नष्ट केल्याचे म्हटले. वास्तविक भारताने ही चाचणी करताना भारताचाच जुना उपग्रह नष्ट केला आहे.त्यामुळे बापट यांनी उत्साहाच्या भरात दिलेली प्रतिक्रिया काही तासांमध्ये व्हायरल झाली आहे. बापट यांना खरी स्थिती त्यांनी हे ट्विट आणि पोस्ट डिलीट केली असली तरी त्याचे स्क्रीनशॉट्स फिरत असल्याने बापट यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यांच्या या ट्विटवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

Web Title: Girish Bapat tweet on Shakti Mission is viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.