आज विसर्जन मिरवणूक : गणपती निघाले गावाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:03 AM2018-09-23T01:03:35+5:302018-09-23T01:03:46+5:30

पुणे जिल्ह्यात विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात अगोदरच तयारी करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण २०८५ सार्वजनिक गणपती मंडळे आहेत.

Ganapati visarjan news | आज विसर्जन मिरवणूक : गणपती निघाले गावाला...

आज विसर्जन मिरवणूक : गणपती निघाले गावाला...

Next

नसरापूर : पुणे जिल्ह्यात विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात अगोदरच तयारी करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण २०८५ सार्वजनिक गणपती मंडळे आहेत.
यात प्रामुख्याने शिरूर, जेजुरी, बारामती, जुन्नर, दौंड, आळेफाटा याठिकाणी १०० पेक्षा अधिक गणपती मंडळे असून, गणपती विसर्जन सुरक्षितपणे पाडण्याच्या दृष्टिकोनातून १ पोलीस अधीक्षक, २ अप्पर पोलीस अधीक्षक, १० पोलीस उप अधीक्षक, २०० पोलीस अधिकारी, २३०० पोलीस कर्मचारी, १००० होम गारड,६०० विशेष पोलिस अधिकारी, १ एसआरपीएफ, प्लातून १० स्ट्रायकिंग फोर्स, ४ दंगाविरोधी पथके अशा रीतीने पोलिस बंदोबस्त नेमण्यात आल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
गणपती विसर्जनाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी आधीच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास आली आहे. एकूण ४०३१ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या विसर्जन दरम्यान अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग केले
जाणार आहे.

कळंब (ता. आंबेगाव) येथील घोड नदीच्या दशक्रिया घाटावर गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी दशक्रिया घाटावर रात्रीच्या लाईटची योग्य व्यवस्था, जनरेटर, माईक व स्टेजची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, पोहणाºया माणसांची सोय गणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेली आहे. पार्किंगसाठी या ठिकाणी योग्य असे नियोजन कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, निर्माल्य गोळा करण्यासाठी कळंब ग्रामपंचायतीच्या व रोटरी क्लब मंचरच्या वतीने ट्रॅक्टर ट्रॉली व घंटागाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती कळंब ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्रीताई नितीन भालेराव आणि उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी दिली.
मिरवणूक शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचे आवाहन व गणपती बुडवताना कार्यकर्त्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी केले आहे. गणेशमूर्तीचे विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने व कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

डीजेबंदीबाबत संभ्रम कायम
पुणे : विसर्जन मिरवणुकीत डीजेला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, पोलिसांकडून मंडळांना ध्वनिमर्यादा पाळून स्पीकर, मिक्सर लावण्यास परवानगी दिली जात आहे. तर काही साऊंड सिस्टिमवाल्यांना मात्र बंदीचे कारण दाखवत परवानगी नाकारली जात असल्याने ‘डीजे’ बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आज (दि. २३) मिरवणुकीदरम्यान मंडळे कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टीमचा वापर करण्याबाबत दि. १३ सप्टेंबर रोजीच्या प्रतिबंधात्मक आदेशात निर्बंध घातले आहेत.

पुण्यात जय्यत तयारी
पुणे : दहा दिवसांच्या धामधुमीनंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सांस्कृतिक राजधानी सज्ज झाली आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त साद घालत गणरायाला आज साश्रू नयनांनी निरोप दिला जाणार आहे. सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती गणपतींच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी संध्याकाळपासून गणेश मंडळांनी देखावे उतरवण्यास सुरुवात केली. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शांतता पाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मानाच्या पाचही गणपतींची विसर्जन मिरवणुकींचाप्रारंभ सकाळी १० वाजता टिळक पुतळयापासून होणार आहे. पारंपरिक साज असलेले रथ, ढोल-ताशा पथक, फुलांचा रथ, विद्युत रोषणाई अशी जय्यत तयारी शनिवारी रात्रभर सुरू होती. गणेशोत्सव म्हटले, की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. अगदी गणरायाच्या स्वागताबरोबरच त्याला निरोपासाठीदेखील जोरदार तयारी केली जाते. किंबहुना विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष अधिक असतो. काही मंडळांची विसर्जन रथ
तयार करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच तयारी सुरू होती.
मात्र, बहुतांश मंडळांत विसर्जनाच्या आदल्या दिवसापासून रथ
सजविताना दिसतात.

वडगाव निंबाळकरमध्ये डीजे सिस्टीम जप्त


वडगाव निंबाळकर : गणेशविसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी असतानादेखील वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील एका गणेश मंडळाने मोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनि प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाºया या गणेश मंडळावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई करून मंडळाच्या अध्यक्षासह डीजे मालकावर गुन्हा दाखल करून डीजे साऊंड सिस्टीम जप्त केली.
शनिवारी (दि. २२) सहाच्या सुमारास वडगाव निंबाळकर येथील शिवशक्ती तरुण मंडळाची गणेशविसर्जन मिरवणूक नीरा-बारामती मार्गावरून निघाली होती. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहायक फौजदार शरद वेताळ, पोलीस हवालदार विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर सानप हे त्या ठिकाणी आले असता, जिल्हाधिकाºयांनी दिलेले आदेश न जुमानता त्या भागात रस्त्यावरच भल्यामोठ्या कर्कश आवाजात मंडळाकडून डीजे वाजविणे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित मंडळाने पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा परवाना घेतलेला नव्हता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून एमएच ११-एम ४५८७ या क्रमांकाचे डीजे वाहन तसेच ७ लाख ४९ हजार रुपयांचे डीजे साहित्य पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले असून, डीजे मालक अमोल भरत शहा (रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्यासह मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल केला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे इतर डीजे मालकांनी तसेच गणेश मंडळांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

Web Title: Ganapati visarjan news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.