माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात; ताप आणि इन्फेक्शनवर पुण्यात उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:36 AM2024-03-14T10:36:47+5:302024-03-14T10:37:16+5:30

प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यांनी २००७ ते १२ या काळात राष्ट्रपतीपद भुषविले आहे.

Former President Pratibha Patil Hospital; Treatment for fever and chest infection started in Pune | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात; ताप आणि इन्फेक्शनवर पुण्यात उपचार सुरु

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात; ताप आणि इन्फेक्शनवर पुण्यात उपचार सुरु

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप व छातीत इन्फेक्शन झाल्याने त्रास होऊ लागला होता. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

प्रतिभाताई पाटील यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ताप आणि छातीत संसर्गाची तक्रार होती. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. 

प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यांनी २००७ ते १२ या काळात राष्ट्रपतीपद भुषविले आहे. त्या ८९ वर्षांच्या आहेत. 1962 मध्ये त्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर मतदारसंघातून प्रथमच विधानसभेमध्ये निवडून गेल्या होत्या. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पती देवीसिंग शेखावत यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. 
 

Web Title: Former President Pratibha Patil Hospital; Treatment for fever and chest infection started in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.