माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:43 AM2019-02-06T01:43:07+5:302019-02-06T01:43:26+5:30

माजी क्रिकेटपटू आणि शेकडो खेळाडू घडविणारे नामवंत प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे पुण्यात मंगळवारी (दि. ५) सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

 Former cricketer, coach Rajabhau Oak passed away | माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे निधन

माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे निधन

Next

पुणे : माजी क्रिकेटपटू आणि शेकडो खेळाडू घडविणारे नामवंत प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांचे पुण्यात मंगळवारी (दि. ५) सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
दि. ब. देवधर क्रिकेट ट्रस्ट या अकादमीच्या माध्यमातून ओक यांनी फक्त पुणेच नव्हे तर महाराष्ट्राच्या क्रिकेट विकासासाठी भरीव स्वरूपाचे योगदान दिले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा प्रशिक्षक श्याम ओक, मुलगी, सून नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवधर अकादमीने अनेक दर्जेदार क्रिकेटपटू पुण्याला तसेच महाराष्ट्राला दिले. यामागे ओक यांची ३४ वर्षांची साधना होती. त्यांनी या अकादमीसाठी आणि खेळाडू घडविण्यासाठी समर्पित वृत्तीने मेहनत घेतली.
क्रिकेटवर नितांत पे्रम करणाऱ्या ओक यांनी मिलिंद गुंजाळ, सुरेंद्र भावे, शंतनू सुगवेकर, संतोष जेधे, अरू ण घाटपांडे, राजू भालेकर, विजय शेट्टी, मकरंद दीक्षित असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू घडविले. त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेट क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title:  Former cricketer, coach Rajabhau Oak passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे