पाेहायला जाण्याअाधी या गाेष्टींकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 02:42 PM2018-04-29T14:42:22+5:302018-04-29T14:42:22+5:30

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने अनेकजण पाेहण्यासाठी जलतरण तलावात जात असतात. तरुणांकडून विविध ठिकाणी पाेहण्यासाठी जाण्याचे प्लॅनही अाखले जातात. पाेहयला जाताना खालील अाठ गाेष्टींकडे एकदा लक्ष द्या.

follow these safety measures before going for swimming | पाेहायला जाण्याअाधी या गाेष्टींकडे लक्ष द्या

पाेहायला जाण्याअाधी या गाेष्टींकडे लक्ष द्या

पुणे : उन्हाचा कडाका वाढत असल्याने तरुणांची पाऊले जलतरण तलाव, तसेच विविध धरणांकडे वळत असतात. अनेकदा पाेहताना काळजी न घेतल्याने अनेकांचे जीव जाण्याचे प्रकार घडत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील विविध जलतरण तलावात बुडून तरुणांचे मृत्यू झाले अाहेत. तसेच मुळशी येथील धरणात उतरलेले काही विद्यार्थी बुडल्याचे प्रकरणी ताजे आहे. त्यामुळे पाण्यात उतरण्याअाधी पुढील गाेष्टींकडे अावर्जुन लक्ष द्या. 

1.सेफ्टी इक्विपमेंटस
ज्या जलतरण तलावावर पाेहण्यासाठी तुम्ही जात अाहात तेथे याेग्य ती सेफ्टी इक्विपमेंटस अाहेत का याची अाधी पाहणी करा. तसेच ही सेफ्टी इक्विपमेंटस सुस्थित अाहेत का याकडेही लक्ष द्या. अनेकदा काही जलतरण तलावावर असे इक्विपमेंटस नसतात. अशा तलावांमध्ये पाेहण्याचे टाळा. 

2. लाईफ गार्ड्स
जलतरण तलावामधील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लाईफ गार्डस. प्रत्येक तलावांवर लाईफ गार्डस असणे अावश्यक अाहे. त्याचबराेबर त्या लाईफ गार्डसचे सर्टिफिकेशन झाले अाहे का, त्यांनी याेग्य प्रशिक्षण घेतले अाहे का याची माहिती घ्या. काेणी पाण्यात बुडत असेल तर त्याला कसे वाचावयचे तसेच पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर काेणते प्रथाेमचार करायला हवेत याची या लाईफ गार्डसना माहिती असणे अावश्यक अाहे. 

3. स्वच्छ जलतरण तलाव
जलतरण तलाव हा स्वच्छ असणे अत्यंत अावश्यक अाहे. पाेहताना जलतरण तलावाचा तळ दिसणे गरजेचे अाहे. जलतरण तलावात अस्वच्छ पाणी असेल तर काेणी डुबत असेल तर ते कळणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे नेहमी पाणी स्वच्छ असणे अावश्यक अाहे. ठराविक कालावधीनंतर तलाव स्वच्छ करायला हवा. त्यामुळे पाेहयला जाण्याअाधी तलाव स्वच्छ अाहे का याची पाहणी करा. 

4. प्रशिक्षकांच्या सुचनांचे पालन करा
तु्म्ही जर पाेहायला शिकत असाल तर प्रशिक्षकांच्या सुचनांचे पालन करा. अनेकदा पाेहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर उत्साहाच्या भरात प्रशिक्षकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केले जाते. असे न करता सुचनांचे पालन करणे अावश्यक अाहे. काहीही अडचण असेल तर मनमाेकळेपणाने प्रशिक्षकांना किंवा लाईफ गार्डसला त्याची माहिती द्या. 

5. पाेहताना दम लागला तर बॅक फ्लाेट करा
अनेकदा पाेहताना धाप लागते, श्वास अपूरा पडताे अश्यावेळी बॅक फ्लाेट करावे. त्याचबराेबर शरीर सैल साेडायला हवे. त्याचबराेबर अजिबात घाबरुन जाऊ नये. बॅक फ्लाेट केल्याने तुमच्या नाका-ताेंडात पाणी जाणार नाही. अाणि तुम्हाला माेठा श्वासही घेता येईल. 

6. जलतरण तलावात पाेहणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे जलतरण तलावांवर माेठी गर्दी पाहायला मिळते. अनेकदा सर्वच्या सर्व बॅचेस फुल हाेत असतात. परंतु एका बॅचमध्ये पाेहणाऱ्यांची संख्या मर्यादित असणे अावश्यक अाहे. ही संख्या त्या जलतरण तलावाची लांबी अाणि रुंदी यांच्यावर अवलंबून असते. क्षमतेपेक्षा अधिक लाेक एकावेळी पाेहत असतील तर प्रत्येकावर लक्ष ठेवणे अवघड जाते. त्यामुळे पाेहणाऱ्यांची संख्या मर्यादित असणे अावश्यक अाहे. 

7. धरण, किंवा तलावात पाेहण्यासाठी जाताना दारु पिऊन जाऊ नये
उन्हाळ्यात धरणांवर, तलावावर पाेहण्यासाठी जाण्याचे प्लॅन अाखले जातात. अश्यावेळी काहींकडून मद्यपान करुन पाण्यात उतरले जाते. मद्यपान करुन पाेहायला गेल्यास बुडून मृत्यू हाेऊ शकताे. त्यामुळे कधीही मद्यपान करुन पाेहायला पाण्यात उतरु नये. अशा ठिकाणी काेणी दारु पिण्याचा अाग्रह धरला तरी मनावर ताबा ठेवूत त्याला नकार द्यावा. 

8. खाेलीचा अंदाज असणे अावश्यक 
ज्या पाणवठ्यावर अापण पाेहायला जाताेय त्याची खाेली किती अाहे. कुठे अधिक धाेका अाहे. याची अाधिच माहिती करुन घ्या. गरज पडल्यास स्थानिकांकडून माहिती घ्या. कुठलाही धाेका पत्करु नका. नेहमीचे ठिकाण नसेल तर कुठलेही धाडस करु नका.

Web Title: follow these safety measures before going for swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.